आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी ‘देवगिरी’ च्या खेळाडूंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:01 IST2018-01-11T01:00:52+5:302018-01-11T01:01:46+5:30
कुरुक्षेत्र येथे १२ ते २१ जानेवारीदरम्यान होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक व मल्लखांब स्पर्धेसाठी देवगिरी महाविद्यालयाच्या सात खेळाडूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.

आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी ‘देवगिरी’ च्या खेळाडूंची निवड
औरंगाबाद : कुरुक्षेत्र येथे १२ ते २१ जानेवारीदरम्यान होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक व मल्लखांब स्पर्धेसाठी देवगिरी महाविद्यालयाच्या सात खेळाडूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. जिम्नॅस्टिकमध्ये ऋतिका महाजन, शर्वरी लिमये, साक्षी लढ्ढा यांची निवड झाली आहे तर मल्लखांबमध्ये संदेश चितलवाड, तेजस पळसकर, मानसी पेरे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख डॉ. शेखर शिरसाठ, शेखर कोठुळे, राणी पवार, देवीदास जैस्वाल, ईशांत राय, पंडितराव भोजने यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल म. शि. प्र. मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, देवगिरी महाविद्यालय स्थानिक नियामक मंडळ सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, डॉ. सी. एस. पाटील यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.