प्लास्टिक सर्जरी शिबिरात आज होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:40 IST2017-12-13T00:40:04+5:302017-12-13T00:40:10+5:30
डॉ. शरदकुमार दीक्षित स्मरणार्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरास उद्या बुधवारी १३ पासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.

प्लास्टिक सर्जरी शिबिरात आज होणार तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. शरदकुमार दीक्षित स्मरणार्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरास उद्या बुधवारी १३ पासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे आणि महात्मा गांधी मिशन (एमजीएम) आणि ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर घेण्यात येत आहे. सिडको एन-१ येथील लायन्स आय हॉस्पिटल येथे सकाळी ८.३० वा. शिबिराचे उद्घाटन होणार आहे. बीव्हीजीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एच. आर. गायकवाड तसेच अमेरिकेतील तज्ज्ञ डॉ. राज लाला आणि डॉ. विजय मोराडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी एमजीएमचे प्रमुख अंकुशराव कदम, ड्रगिस्ट अॅण्ड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर, लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप मालू, तसेच गाईड टू काऊन्सिल आॅफ गव्हर्नर एम. के. अग्रवाल यांची उपस्थिती राहणार आहे.
उद्घाटनानंतर लगेच रुग्णांची तपासणी होणार आहे. शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची निवड करण्यात येईल व त्याच वेळी शस्त्रक्रियेची तारीख देण्यात येईल. शस्त्रक्रिया १४ ते १७ तारखेदरम्यान एमजीएम हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र लोहिया यांनी केले आहे.