लायन्सतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबिराला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:01+5:302020-12-17T04:28:01+5:30

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून यंदा डॉ. शरदकुमार दीक्षितांच्या स्मरणार्थ ४५ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला ...

Plastic surgery camp started by Lions | लायन्सतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबिराला सुरुवात

लायन्सतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबिराला सुरुवात

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून यंदा डॉ. शरदकुमार दीक्षितांच्या स्मरणार्थ ४५ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला रविवार, १३ डिसेंबर रोजी सुरुवात झाली.

मागील ४४ वर्षांच्या रुग्णसेवेची परंपरा यंदा खंडित होऊ दिली नाही, हे विशेष. यंदा कोरोना महामारीमुळे डॉ. राज लाला यांना अमेरिकेतून व कोल्हापूरचे डॉ. अमित बस्सनवार यांना औरंगाबादेत येता आले नाही. पण, त्यांनी सर्जरीसाठी ऑनलाईन सहभाग नोंदविला. त्यांच्याऐवजी यंदा डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी ५७ रुग्णांची तपासणी केली. यातील ३५ रुग्णांवर १४ ते ३० डिसेंबरदरम्यान प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. ही सर्जरी अदालत रोडवरील दहिफळे हॉस्पिटलमध्ये होणार आहे. रविवारी सिडको, एन- १ येथील लायन्स आय हॉस्पिटल येथे तपासणीसाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक आले होते.

यंदा कोविड महामारीमुळे हे शिबिर मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष संजीव गुप्ता यांनी दिली. डॉ. दीक्षित व डॉ. लाला यांचे सेवाकार्य असेच पुढे सुरू ठेवण्यात येईल, असे मनोगत डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी व्यक्त केले. औरंगाबाद ड्रगिस्ट व केमिस्ट असोसिएशनतर्फे रुग्णांना मोफत औषधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याप्रसंगी लायनस क्लबचे सचिव विनोद चौधरी, माजी अध्यक्ष राजेश भारुका, जी. एम. बोथरा, प्रकाश गोठी, राजेश लहुरीकर, गजानन झालवार यांची उपस्थिती होती. लियो सदस्य गौरवी भारुका व प्रीती झालवार यांनी सूत्रसंचालन केले. दीपा भारुका व मोहन हिप्पलंनेरकर यांनी रुग्णांची नोंदणी केली.

लायन्स हॉस्पिटलचे प्रीतेश सोनार, सुधाकर पवार आणि कर्मचारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. यावेळी औरंगाबाद इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे लायन्स आय हॉस्पिटलला ऑटोमेटिक सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आले.

Web Title: Plastic surgery camp started by Lions