नांदेड शहरात नववर्षात प्लास्टिक बंदीच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:22 IST2017-11-29T00:22:50+5:302017-11-29T00:22:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: प्लास्टिकमुळे होणाºया दुष्परिणामापासून बचावासाठी राज्यात प्लास्टिक मुक्तीच्या हालचाली सुरु आहेत. याच अनुषंगाने नांदेड शहरही प्लास्टिकमुक्त ...

नांदेड शहरात नववर्षात प्लास्टिक बंदीच्या हालचाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: प्लास्टिकमुळे होणाºया दुष्परिणामापासून बचावासाठी राज्यात प्लास्टिक मुक्तीच्या हालचाली सुरु आहेत. याच अनुषंगाने नांदेड शहरही प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला असून शहरात १ जानेवारीपासून संपूर्णपणे प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. या अनुषंगाने संपूर्ण डिसेंबर महिना महापालिका तसेच स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयांच्या मदतीने जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद येथे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यात प्लास्टिक बंदीचा मुहूर्त हा गुढीपाडव्याचा काढण्यात आला. त्यानुषंगाने प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात येत आहे. नांदेड जि. प.ने २८ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ‘प्लास्टिक वेचा’ मोहीम सुरु केली आहे. त्याच अनुषंगाने नांदेड शहरही प्लास्टिकमुक्त करण्यासाठी मंगळवारी आयुक्त देशमुख यांनी अधिकाºयांना सूचना दिल्या. प्लास्टिकचे दुष्परिणाम नांदेड शहराला पावसाळ्यामध्ये भोगावे लागले. शहरातील अनेक सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. इतकेच नव्हे, तर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले होते. नाल्या न उपसल्यामुळे शहरात पुराची परिस्थिती उद्भवली होती.
लाखो रुपये खर्च करुनही नाले उपसा झाला नव्हता. अनेक नाले आजही प्लास्टिकने भरुन आहेत. त्यामुळे आता नववर्षाच्या प्रारंभापासून प्लास्टिकवर शहरात पूर्णत: बंदी घालण्यात येणार आहे. याबाबत मनपा शहरवासियांमध्ये जनजागृती करणार आहे. यासाठी शाळा-महाविद्यालये तसेच स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे.