मुख्य लेखा अधिकाऱ्यांच्या दालनात छताचे प्लास्टर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:05 IST2021-04-20T04:05:21+5:302021-04-20T04:05:21+5:30

औरंगाबाद ः जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे दालन आहे. अध्यक्षांच्या शेजारीच असलेल्या या दालनाच्या काही ...

The plaster of the roof collapsed in the hall of the Chief Accounting Officer | मुख्य लेखा अधिकाऱ्यांच्या दालनात छताचे प्लास्टर कोसळले

मुख्य लेखा अधिकाऱ्यांच्या दालनात छताचे प्लास्टर कोसळले

औरंगाबाद ः जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे दालन आहे. अध्यक्षांच्या शेजारीच असलेल्या या दालनाच्या काही विटा व प्लास्टरचा भाग पीओपीवर पडला, तर पीओपीसह हे साहित्य टेबलवर पडल्याची घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

वित्त विभागाचे अधिकारी चर्चा करत होते. त्यावेळी वाळू पडण्याचा आवाज होत असल्याने आम्ही उठून बाजुला सरकत होतो. तेव्हा छताच्या विटा पिओपीवर पडल्या. क्षणार्धात पीओपी विटांसह टेबलावर पडली. त्यात टेबलावरच्या काचा फुटल्या. सुदैवाने छताच्या विटा व पिओपीचा भाग टेबलावर पडल्याने कुणाला दुखापत झाली नाही. दरवेळी पीओपी पडते. यावेळी छताच्या विटा कोसळल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी सांगितले. ही इमारत जीर्ण झाल्याने नव्या इमारतीच्या उभारणीची प्रक्रिया निविदा स्तरावर आहे.

Web Title: The plaster of the roof collapsed in the hall of the Chief Accounting Officer