वाळूज एमआयडीसीत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:51 IST2019-06-29T21:51:50+5:302019-06-29T21:51:58+5:30
एच सेक्टरमध्ये असलेल्या मोकळ्या भुखंडावर शनिवारी उद्योजकांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.

वाळूज एमआयडीसीत वृक्षारोपण
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील एच सेक्टरमध्ये असलेल्या मोकळ्या भुखंडावर शनिवारी उद्योजकांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी श्रीराम शिंदे, मसिआचे माजी अध्यक्ष सुनिल किर्दक, विंग कमाडंर टी.आर.जाधव, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेश राजळे, उपाध्यक्ष नारायण पवार, अर्जुन गायकवाड, अनिल पाटील, विकास पाटील, राहुल घोगरे, सर्जेराव ठोंबरे,दिलीप चौधरी, गजानन देशमुख, मसिआचे प्रसिध्दी प्रमूख अब्दुल शेख आदी उपस्थित होते. यावेळी विविध जातींची ५० झाडे लावून ही झाडे जगविण्याचा संकल्प उद्योजकांच्या वतीने करण्यात आला.