बजाजनगरात सामाजिक विचार मंचतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:36 IST2019-05-25T22:35:54+5:302019-05-25T22:36:46+5:30
सामाजिक विचार मंचतर्फे बजाजनगरातील चिंचबन कॉलनी परिसरात शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात आले.

बजाजनगरात सामाजिक विचार मंचतर्फे वृक्षारोपण
वाळूज महानगर : सामाजिक विचार मंचतर्फे बजाजनगरातील चिंचबन कॉलनी परिसरात शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात आले.
चिंचबन कॉलनी परिसरात मंचच्या वतीने शुक्रवारी लायन्स क्लब आॅफ औरंगाबादचे अध्यक्ष अशोक जगधणे, कल्याण पीनप्रतीवार, अॅड. तांदुळजे, उद्योजक पोपटराव थोरात रुपचंद अग्रवाल, सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष विकास पाटील, सचिव केशव ढोले यांच्या प्रमूख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सविता राऊत, संगिता पाटील, लता माळी, आशा दबडे, मिनाक्षी मालोदे, वैष्णवी माळी, पद्मा भगत, वंदना तुपे, सुमन जाधव, राजेंद्र मोरे, चिंतामणी शेटे, यशोधन राऊत, विनोद वडतकर, अर्जुन कदम, दिलीप दबडे, निलेश देसले, अमर निकम आदींनी परिश्रम घेतले.