मोठ्या शाळांमध्ये प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन
By Admin | Updated: August 3, 2014 00:58 IST2014-08-03T00:21:07+5:302014-08-03T00:58:46+5:30
पाथरी : शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण आणि इतर सुविधांसाठी जातीचे प्रमाणपत्र काढावे लागते.

मोठ्या शाळांमध्ये प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन
पाथरी : शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण आणि इतर सुविधांसाठी जातीचे प्रमाणपत्र काढावे लागते. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक मोठ्या शाळेमध्ये जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन महसूल प्रशासनाकडून केले जात असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी बाभळगाव येथील कार्यक्रमामध्ये दिली.
महसूल दिनाचे औचित्य साधून १ आॅगस्ट रोजी सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान योजनेचा कार्यक्रम तालुक्यातील बाभळगाव येथील जि.प. शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील उपस्थित होते. तसेच तहसीलदार देवीदास गाडे, तालुका कृषी अधिकारी बी.आर. काकडे, बाजार समितीचे उपसभापती संजय रनेर, बाभळगावचे सरपंच दिगंबर लिंगायत, मुंजाभाऊ रनेर, माणिकराव रनेर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बाभळगाव येथील तीन शाळेमधील २५० विद्यार्थ्यांना मराठा ईएसबीसी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात कुुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या तीन लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. समाधान योजनेच्या कार्यक्रमात तलाठी चिकटे यांनी चावडीवाचन केले.
यावेळी फारफार अदालतीमध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी समाधान योजनेमध्ये पाथरी उपविभागामध्ये पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्यात विविध कार्यक्रम राबविल्याची माहिती दिली. सूत्रसंचालन ग्रामसेवक शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक नाथभजन यांनी केले. (वार्ताहर)
रहिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी रहिवासी प्रमाणपत्र उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने लागत होते. परंतु शासनाच्या निर्णयानुसार टी.सी.वर रहिवासी असल्याचा पुरावा असेल तर रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी दिली.