जागा ३८; परीक्षार्थी ७ हजारांवर
By Admin | Updated: November 23, 2014 00:24 IST2014-11-23T00:14:26+5:302014-11-23T00:24:29+5:30
लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या सरळसेवा भरतीअंतर्गत ३८ परिचर पदांच्या जागांसाठी शनिवारी झालेल्या परीक्षेत ७ हजार १२३ परीक्षार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली.

जागा ३८; परीक्षार्थी ७ हजारांवर
लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या सरळसेवा भरतीअंतर्गत ३८ परिचर पदांच्या जागांसाठी शनिवारी झालेल्या परीक्षेत ७ हजार १२३ परीक्षार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली.
३८ जागांसाठी ११ हजार २०० अर्ज निवड समितीकडे आले होते. त्यापैकी ९ हजार ६३२ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यानुसार शनिवारी लातूर शहरातील २२ केंद्रांवर परीक्षा झाली. या परीक्षेत ७ हजार १२३ परीक्षार्थी बसले होते. पात्र ठरलेल्या अर्जांपैकी २५१९ जण गैरहजर राहिले. शनिवारी दुपारी २ ते ३.३० यावेळेत परीक्षा असल्याने बाहेरच्या जिल्ह्यातूनही हजारो परीक्षार्थी सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर आले होते.
जिल्हा परिषदेच्या वतीने २२ परीक्षा केंद्रांवर ७०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. परीक्षार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सकाळी १० वाजेपासूनच जि.प.चे कर्मचारी परीक्षा केंद्रांवर ठाण मांडून होते.
राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, सरस्वती विद्यालय, श्री व्यंकटेश महाविद्यालय, सरस्वती विद्यालय, परिमल माध्यमिक विद्यालय, शिवाजी माध्यमिक विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, जयक्रांती विद्यालय, चंद्रभानू सोनवणे महाविद्यालय, हजरत सुरत शाहवली उर्दू हायस्कूल आदी २२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. (प्रतिनिधी)