सखी मंच सदस्यांसाठी ‘पीके’ चित्रपट

By Admin | Updated: February 5, 2015 00:53 IST2015-02-05T00:39:22+5:302015-02-05T00:53:21+5:30

जालना : ‘लोकमत सखी मंच’ व राजमंदिर चित्रपटगृह यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सखी मंच सदस्यांसाठी पीके या बहुचर्चित चित्रपटाचे आयोजन येथील राजमंदिर चित्रपटगृहात

'PK' movie for Sakhi Forum members | सखी मंच सदस्यांसाठी ‘पीके’ चित्रपट

सखी मंच सदस्यांसाठी ‘पीके’ चित्रपट


जालना : ‘लोकमत सखी मंच’ व राजमंदिर चित्रपटगृह यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सखी मंच सदस्यांसाठी पीके या बहुचर्चित चित्रपटाचे आयोजन येथील राजमंदिर चित्रपटगृहात शुक्रवार दि. ६ फेब्रुवारीपासून ते ८ फेब्रुवारीपर्यंत दुपारी १२ ते ३ आणि ३ ते ६ या वेळेत करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी सखी मंच सदस्यांना नाममात्र १० रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे.
महिलांसाठी लोकमत सखी मंच हे हक्काचे व्यासपीठ आहे. महिलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी या व्यासपीठाचे नियमीत प्रोत्साहन असते. या व्यासपीठांतर्गत प्रामुख्याने लावणी, नाटिका, आॅर्केस्ट्रा, पाक कला स्पर्धा आदी बहारदार व दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
याचेच पुढचे पाऊल म्हणजे या शुक्रवारपासून सखी मंच सदस्यांना आमीरखान अभिनीत ‘पीके’ हा बहुचर्चित चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदरील चित्रपट हा येथील राजमंदिर चित्रपटगृहामध्ये दुपारी १२ ते ३ व ३ ते ६ या दोन शो-मध्ये दाखविण्यात येणार असून या चित्रपटाची तिकीटे अत्यंत नाममात्र दरात (रुपये १०) चित्रपटगृहातच उपलब्ध असणार आहेत. सखी मंच सदस्यांनी चित्रपटास येताना सोबत आपले ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
ओळखपत्र दाखविल्याशिवाय १० रुपयांत तिकीट मिळणार नाही. तसेच लहान मुलांनाही सोबत आणू नये. तरी जास्तीत जास्त सखी मंच सदस्यांनी आपल्या सवडीनुसार या चित्रपटाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सखी मंच व राजमंदिर चित्रपटगृहाचे संचालक जगदिश अग्रवाल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'PK' movie for Sakhi Forum members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.