दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:06 AM2021-05-08T04:06:06+5:302021-05-08T04:06:06+5:30

दहा ते पंधरा वर्षांपासून हा रस्ता रखडला असून, निवडणुका आल्या की, लोकप्रतिनिधी दुरुस्तीची आश्वासने देतात. मात्र, नंतर ती आश्वासने ...

Pits on the road from Dabhade Vasti to Korhala | दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे

दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे

googlenewsNext

दहा ते पंधरा वर्षांपासून हा रस्ता रखडला असून, निवडणुका आल्या की, लोकप्रतिनिधी दुरुस्तीची आश्वासने देतात. मात्र, नंतर ती आश्वासने हवेत विरून जातात. दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा या रस्त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाहीत. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात वाहने आदळून छोटे- मोठे अपघात होत आहेत. जेमतेम सहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्धा तास लागत आहे. गेल्या अनेक वर्षांत या रस्त्याची साधी मलमपट्टी न झाल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्यादरम्यान अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाइपलाइन टाकण्यासाठी चर खोदले आहेत. त्यामुळे अपघातांना नियंत्रण मिळत आहे. गावकऱ्यांनी अनेक वेळा रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

कोट

दाभाडे वस्ती ते आधरवाडी, तांडामार्गे कोऱ्हाळा रस्ता ठिकठिकाणी उखडल्याने परिसराचा विकास खुंटला आहे. याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा.

-साहेबराव पवार, तांडा ग्रामस्थ

कोट

आधरवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचले की, खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वेळा अपघात होतात. रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो.

-बबन रामसिंग चव्हाण, उपसरपंच

फोटो : सिल्लोड तालुक्यातील दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा रस्त्यावर असे खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना त्रासाला समोरे जावे लागत आहे.

070521\img_20210313_160242_635_1.jpg

सिल्लोड तालुक्यातील दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा रस्त्यावर असे खड्डे पडले असल्याने वाहन धारकाना वाहन चालवताना त्रासाला समोरे जावे लागत आहे.

Web Title: Pits on the road from Dabhade Vasti to Korhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.