थातूर मातूर पद्धतीने बुजवले जाताय खड्डे
By | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:09+5:302020-11-28T04:08:09+5:30
रस्त्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून डांबराऐवजी मातीमिश्रित मुरूम टाकून या चार किलोमीटर रस्त्याचे काम काम चालू आहे. ...

थातूर मातूर पद्धतीने बुजवले जाताय खड्डे
रस्त्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून डांबराऐवजी मातीमिश्रित मुरूम टाकून या चार किलोमीटर रस्त्याचे काम काम चालू आहे. या कामात काही ठिकाणी खड्डे तसेच सोडून दिले जात आहे. तालुक्यातील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत शिष्टमंडळाने राज्यपाल नुकतीच भेट घेतली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाल्याने अचानकपणे उक्कडगाव कोपरगाव रोडवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
----------- कोट -----------
उक्कडगाव कोपरगाव रस्त्यावरील खड्डे डांबराऐवजी मातीमिश्रित मुरूमाने भरले जात असल्याची तक्रार आहे. असे असेल तर मातीमिश्रित मुरुमाने भरलेली खड्डे पुन्हा उखडून त्याऐवजी डांबर टाकण्यात येईल.
- एस.बी. काकड, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग वैजापूर.
- कॅप्शन : उक्कडगाव कोपरगाव रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम चालू असून डांबरऐवजी मातीमिश्रित मुरूम टाकण्यात येत आहे.