जिल्हा क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था
By Admin | Updated: June 28, 2014 01:17 IST2014-06-28T00:44:01+5:302014-06-28T01:17:04+5:30
जालना : शहरातील महत्वाचे असलेल्या शासकीय क्रीडा संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. क्रीडा विभागाच्या उदासीन धोरणामुळे संकुलाचे तीनतेरा वाजले आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था
जालना : शहरातील महत्वाचे असलेल्या शासकीय क्रीडा संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. क्रीडा विभागाच्या उदासीन धोरणामुळे संकुलाचे तीनतेरा वाजले आहेत.
शहरातील मध्यवस्तीत शासनाने कोट्यवधीरुपये खर्च करुन प्रशस्त असे क्रीडा संकुल उभारले. परंतु क्रीडा विभागाच्या उदासीन व तकलादू धोरणामुळे कोट्यवधी रुपयांचे संकुल आज भकास बनले आहे. संकुला सुविधांऐवजी गैरसोयीच जास्त आहेत. वादळी वाऱ्यात संकुलाचे पत्रे, अँगल्स व इतर साहित्याचे अतोनात नुकसान झाले. या घटेनला चार ते पाच महिने उलटूनही हे दुरुस्त करण्याची तसदीही क्रीडा कार्यालयाने घेतली नाही. मुख्य मैदान व परिसराची नियमित साफ सफाई अथवा निगा राखली जात नाही. परिणामी खेळाडूंना कोठे खेळावे असा प्रश्न पडतो. संकुलातील सर्वच साहित्य धूळ खात पडून आहे.
बॅडमिंटन हॉलची वाईट अवस्था आहे. नियमित सफाई होत नसल्याने तेथेही घाणीचे साम्राज्य आहे. (वार्ताहर)
संकुल बनले भकास
शहरातील मध्यवस्तीत शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन प्रशस्त असे क्रीडा संकुल उभारले. परंतु क्रीडा विभागाच्या उदासीन व तकलादू धोरणामुळे संकुल आज भकास बनले आहे.