शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणाजवळील ६० लाखांची पिचिंग वाहून गेली; निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:10 IST

जायकवाडी विद्युत निर्मिती केंद्राजवळ दीड वर्षांपूर्वीच ६० लाखांतून पिचिंग केली होती

- दादासाहेब गलांडेपैठण : जायकवाडी धरणाजवळील विद्युत निर्मिती केंद्राच्या (हायड्रो) पाण्यात दगड, माती व इतर घाण जाऊ नये, यासाठी पिचिंगचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून जायकवाडीतून गोदापात्रात सोडलेल्या पाण्यासोबत हे काम वाहून गेलेे. त्यामुळे अवघ्या दीड वर्षांपूर्वी केलेला ६० ते ७० लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हे काम झाले, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

जायकवाडी धरणालगत गोदापात्राला लागून विद्युत निर्मितीचा प्रकल्प आहे. वीज निर्मितीसाठी पंपिंग तसेच विद्युत निर्मिती करताना माती, दगड, टर्बाइनला लागू नये म्हणून येथे पिचिंग व काही काँक्रिटीकरण करण्यात आले होते. दीड वर्षापूर्वी बांधकाम विभागाने कंत्राटदाराच्या माध्यमातून हे काम केले होते. त्यावर सुमारे ६० ते ७० लाखांचा खर्च करण्यात आला होता.

पैसा पाण्यात, चौकशीची मागणीगोदावरीतून होणाऱ्या संभाव्य विसर्गाच्या अंदाजानुसार हे काम करणे अपेक्षित होते. परंतु, गेल्या दोन आठवड्यांत सोडलेल्या पाण्यात त्याचा निभाव लागू शकला नाही आणि पिचिंग वाहून गेले. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कामाची, ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत बांधकाम विभागाचे घुले यांच्याशी संपर्क केला असता, मी आता हे काम बघत नाही, याबाबत काही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

वरिष्ठांना माहिती देऊनुकताच पैठण येथील वीज निर्मिती प्रकल्पाचा पदभार घेतलेला आहे. हे काम अगोदर झालेले आहे. बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम केल्याचे कळते. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली जाईल.- उमेश देव, उपकार्यकारी अभियंता, हायड्रो

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी