शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अपघात रोखण्यासाठी खड्डे बुजविण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 19:01 IST

वाळूज उद्योगनगरीत अपघात रोखण्यासाठी वाहतुक शाखेच्यावतीने पुढाकार घेण्यात आला असून शनिवारपासून  खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत अपघात रोखण्यासाठी वाहतुक शाखेच्यावतीने पुढाकार घेण्यात आला असून शनिवारपासून  खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत परिसरातील मुख्य चौकातील रस्ते खडी व डांबर टाकुन बुजविण्यात आले.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील प्रमूख चौक तसेच औरंगाबाद- नगर महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने कायमच लहान- मोठे अपघात घडत आहेत. रात्रीच्यावेळी अंधारात वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्यामुळेही वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. औद्योगिक क्षेत्रात शहर व ग्रामीण भागातुन मोठ्या प्रमाणात कामगार, उद्योजक व व्यवसायिक रोजच ये- जा करत असतात. त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अपघात सत्र थांबविण्यासाठी वाळूज वाहतुक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक ताहेर पटेल आदींनी पुढाकार घेतला आहे.

शनिवारी तिरंगा चौक, ए.एस.क्लब, महावीर चौक व बजाज विहार आदी भागातील मोठाले खड्डे खडी व डांबर टाकुन बुजविण्यात आले. नगररोडवरील खड्डे बुजविण्यासाठी तसेच वाहतुक सिग्नलवर पांढरे पट्टे मारण्यासाठी के. टी. संगम कन्स्टक्शन कंपनीकडे पत्र व्यवहार करण्यात आल्याचे निरीक्षक उदार यांनी सांगितले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMIDCएमआयडीसीWaluj MIDCवाळूज एमआयडीसीtraffic policeवाहतूक पोलीस