पुन्हा मंगळसूत्र चोरी
By Admin | Updated: October 11, 2014 00:39 IST2014-10-11T00:20:50+5:302014-10-11T00:39:56+5:30
औरंगाबाद : शहरात मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शिवाजीनगर येथे भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले.

पुन्हा मंगळसूत्र चोरी
औरंगाबाद : शहरात मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शिवाजीनगर येथे भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. पोलीस अधिकारी, कर्मचारी निवडणूक बंदोबस्ताच्या कामात व्यग्र असल्याची संधी मंगळसूत्र चोरटे साधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शिवाजीनगर १२ व्या योजनेमध्ये राहणाऱ्या रेवती सुनील शेलगावकर आज दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास शिवणकाम क्लाससाठी पायी जात होत्या. शिवाजीनगर येथील भारतीय स्टेट बँकेपासून काही अंतरावर असताना पल्सरवरून आलेल्या दोन चोरट्यांनी अचानक रेवती यांच्यासमोर येऊन मोटारसायकल उभी केली. यावेळी मोटारसायकलवर मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका देऊन तोडून घेतले. त्यानंतर ते तेथून वेगाने निघून गेले.