चिकलठाण्यात होणार पीटलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:36+5:302021-07-07T04:06:36+5:30
औरंगाबाद : शहरातील चिकलठाणा येथे रेल्वेची पीटलाइन होणार आहे. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती मंगळवारी रेल्वे ...

चिकलठाण्यात होणार पीटलाइन
औरंगाबाद : शहरातील चिकलठाणा येथे रेल्वेची पीटलाइन होणार आहे. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती मंगळवारी रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्यांना देण्यात आली.
नांदेड विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची दुसरी बैठक मंगळवारी ऑनलाइन पार पडली. यावेळी मागील बैठकीत झालेल्या विषयांचे काय केले, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर सांगितलेल्या सूचनांची नोंद केल्याची माहितीच रेल्वे अधिकाऱ्यांना देता आली. त्यावरून समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला.
बैठकीस नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य प्रफुल्ल मालानी, भावेश पटेल, सय्यद अब्दुल रहेमान, विजय जैस्वाल यांच्यासह मराठवाड्यातील सर्व सदस्य उपस्थित होते. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) उपिंदर सिंघ अध्यक्ष म्हणून होते. प्रारंभी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जय पाटील यांनी विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची माहिती दिली. मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस रेल्वेही ३ मिनिटे थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सदस्यांनी दिलेल्या सूचनांचा आणि मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन उपिंदर सिंघ यांनी दिल्याचे सदस्यांनी सांगितले.
वर्षभरात पीटलाइन
पीटलाइन चिकलठाणा येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्षभरात पीटलाइन होईल. रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्याचेही लवकरच काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
- प्रफ्फुल मालाणी, सदस्य, नांदेड विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती