पिंपळनेरात महिलेचा विष पाजून खून
By Admin | Updated: May 20, 2017 00:38 IST2017-05-20T00:35:29+5:302017-05-20T00:38:54+5:30
बीड : जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका महिलेस विषारी द्रव पाजण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पिंपळनेरात महिलेचा विष पाजून खून
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका महिलेस विषारी द्रव पाजण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना पिंपळनेर (ता. शिरुर) येथे गुरूवारी घडली.
मीना खंडू जायभाये (३०, रा. पिंपळनेर) असे मयताचे नाव आहे. गुरूवारी सायंकाळी पाच वाजता शेतातून घरी परतल्यानंतर जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांना जाऊ आशाबाई व दीर आश्रुबा जायभाये यांनी विषारी द्रव पाजला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारच्या लोकांनी तातडीने मीनाला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. शुक्रवारी अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मृत्यूपर्वी जवाबात मीना यांनी जुन्या भांडणारून दीर व जाऊ यांनी विषारी द्रव पाजल्याचे म्हटले आहे. त्यावरून दवाखाना चौकीत नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिरूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.