गुलाबी थंडीची चाहूल
By Admin | Updated: November 16, 2015 00:41 IST2015-11-16T00:34:35+5:302015-11-16T00:41:53+5:30
औरंगाबाद : दिवाळी सण संपताच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पाच दिवसांपासून तापमानात तीन अंशांनी घट झाली आहे. आॅक्टोबर हिटमुळे

गुलाबी थंडीची चाहूल
औरंगाबाद : दिवाळी सण संपताच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पाच दिवसांपासून तापमानात तीन अंशांनी घट झाली आहे. आॅक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना तापमान कमी झाल्यामुळे दिलासा मिळत आहे. थंडीमुळे कपाटात ठेवलेले ऊबदार कपडे बाहेर काढले जात आहेत. स्वेटर, कानटोपीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.
गेली दोन वर्षे दिवाळीत थंडीचा अनुभव न आल्याने कुडकुडणाऱ्या थंडीत अभ्यंगस्नानाचा आनंद घेता आला नाही. यंदा दिवाळीत सुरुवातीलाच गुलाबी थंडीला सुरुवात झाल्याचा अनुभव आला. शहरातील तापमान दोन-तीन अंशांनी खाली आले असून थंडीची चाहूल लागली आहे.
आगामी काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी खाली जाणार असून यंदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. थंडीला सुरुवात झाल्यामुळे स्वेटर, कानटोप्या, मफलर यांची बाजारपेठ फुलत आहे. त्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची पावले दुकाने आणि बाजारपेठांकडे वळत आहेत. हिवाळा म्हटले की या कालावधीत आरोग्याकडे सर्वांधिक जास्त लक्ष दिले जाते. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे युवा वर्गाची पावले व्यायामशाळेकडे वळत आहेत. बाजारात खारीक, खोबरा, काजू, किसमिस, बदाम आदींची खरेदी वाढत आहे.