अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा जथा रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:01 IST2016-07-10T00:43:12+5:302016-07-10T01:01:35+5:30

औरंगाबाद : अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाविक रवाना होतात. यंदाही अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंचा जथा रवाना होत आहे.

Pilgrims leave for Amarnath yatra | अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा जथा रवाना

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा जथा रवाना

औरंगाबाद : अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाविक रवाना होतात. यंदाही अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंचा जथा रवाना होत आहे. शनिवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ‘जय जय बाबा बर्फानी’ ची घोषणा देऊन ८८ भाविक रवाना झाले. यात्रेकरूंना औषधी साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम रोटरी क्लब सेंट्रलतर्फे घेण्यात आला.
शनिवारी सचखंड एक्स्प्रेसने ८८ भाविक रवाना झाले. यामध्ये ३० महिलांचा समावेश असून, १९ दिवस ही यात्रा चालणार आहे. सलग विसाव्या वर्षी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीने प्रवास आणि यात्रेदरम्यान लागणाऱ्या जीवनावश्यक औषधी देण्यात आली. यावेळी रोटरीचे अध्यक्ष बालाजी सिंग, आशुतोष बडवे, प्रशांत गाडगीळ, बस्वराज जिबकाटे, अरुण राव, डॉ. संजीव मुंदडा, भारत चोपडे आदींनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. १५ वर्षांपासून अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना औषधांसाठी सहकार्य करणारे जयनारायण लाठी हे यावेळी उपस्थित होते. जथ्याचे संचालन ताराचंद कहाटे, पुष्पा कहाटे, अरविंद शेवाळे, विजय पोपटसिंग राजपूत करीत आहेत. राजाराम सेवलीकर, सुदाम साळवे, कैलास गायकवाड, महालिंग जंगम या प्रयत्नशील आहेत.

Web Title: Pilgrims leave for Amarnath yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.