शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

चालकाच्या मुजोरपणामुळे कळंबचे प्रवासी ताटकळले

By admin | Published: February 26, 2017 12:41 AM

शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील बसस्थानकात शनिवारी दुपारी आलेली लातूर आगाराची बस कळंबला न नेण्याचा पवित्रा चालकाने घेतल्याने काही काळ प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला़

शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील बसस्थानकात शनिवारी दुपारी आलेली लातूर आगाराची बस कळंबला न नेण्याचा पवित्रा चालकाने घेतल्याने काही काळ प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला़ मोठ्या वादंगानंतर चालकाने बस पुढे कळंबकडे नेली़ या बसस्थानकात अवेळी येणाऱ्या बस आणि बंद झालेल्या काही बसेसमुळे प्रवाशांना तासंतास बसस्थानकात ‘लालपरी’ची वाट पहावी लागते़शिराढोण येथील बसस्थानकात कळंब डेपोच्या सहा आणि लातूर डेपोच्या पाच गाड्या धावतात. दिवसभरात एकूण ३० फेऱ्या होत असून, याद्वारे विविध मार्गावर वाहतूक करणारे प्रवाशी ये-जा करतात़ शनिवारी कळंबकडे जाण्यासाठी ११ ते ३ वाजेपर्यंत एकही बस आली नाही. या चार तासांच्या दरम्यान शेकडो प्रवासी ताटकळत बसची वाट पाहत होते. वाहतूक नियंत्रकाला प्रवासी बस कधी येणार याची विचारणा करीत होते. वाहतूक नियंत्रक दर अर्ध्यातासाला गाडी आहे़ परंतु आज गाडी आली नाही, येईल वाट पहा असे सांगत होते. प्रवाशांमध्ये शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांची संख्या मोठी होती. दुपारी अडीच वाजता लातूर डेपोची बस शिराढोण बसस्थानकात आली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला़ मात्र, त्या गाडीच्या चालकाने बस परत लातूरला जाणार आहे, असे वाहतूक नियंत्रकांना सांगितल्यावर प्रवाशांनी गोंधळ घातला. वाहतूक नियंत्रकांनी ११ वाजल्यापासून कळंबला गाडी गेलेली नाही असे सांगितल्यानंतरही चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. वाहतूक नियंत्रकांनी आगार व्यवस्थापकांशी मोबाईलवरून संपर्क करून परिस्थिती कळविली. यावर कळंबच्या अगार व्यवस्थापकांनीही बसगाडी कळंबला पाठवा असे सांगितले. वाहतूक नियंत्रकांनी चालकाला बस कळंबला नेण्याबाबत लेखी दिले; तरीही लातूर डेपोचे चालक ‘मी लातूरला परत जाणार आहे’, याच भूमिकेवर ठाम होते. यामुळे प्रवासी, वाहतूक नियंत्रक व चालक यांच्यात जवळपास ३० मिनिटे गोंधळ सुरू होता. त्यानंतर चालकाने बस पुढे कळंबकडे नेली़ विशेष म्हणजे, यानंतर अवघ्या दहा मिनिटात एका पाठोपाठ एक अशा आणखी दोन गाड्या कळंबकडे जाण्यासाठी या स्थानकात दाखल झाल्या. सकाळी ११ पासून ३ वाजेपर्यंत कळंबकडे जाण्यासाठी एकही गाडी आली नाही़ परंतु तब्बल चार तासानंतर १५ मिनिटात एकापाठोपाठ एक अशा तीन गाड्या कळंबकडे धावल्या. अनियमित येणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांना मात्र, गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन वेळेवर बसेस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे़