यात्रेचा निधी कोटीच्या घरात
By Admin | Updated: November 28, 2014 01:08 IST2014-11-28T00:27:59+5:302014-11-28T01:08:41+5:30
नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेसाठी नियोजित ७५ लाख निधीशिवाय अणखी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करावी

यात्रेचा निधी कोटीच्या घरात
नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेसाठी नियोजित ७५ लाख निधीशिवाय अणखी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.तसेच वेगवेगळ््या विभागानेही यात्रेसाठी निधी वाढवून देण्याची विनंती केल्याने यंदा यात्रेचे नियोजन एक कोटीपर्यंत जाण्याची स्थिती आहे.
माळेगाव यात्रेच्या पुर्वतयारीसाठी गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आरोग्य, पाणी यासह विविध विभागांचा नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांची उपस्थिती होती. यावर्षी डिसेंबर महिन्यात माळेगाव यात्रेस प्रारंभ होणार असून खबरदारी व नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. डिसेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी विभागनिहाय ७५ लाख रुपयांच्या निधीची तरतुद जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने सदर बैठकीत विशेष सूचना दिल्या. या यात्रेत महसूल आणि पोलिस प्रशासनाचा सहभाग महत्वाचा असून सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण कक्ष पाच दिवस कार्यान्वित ठेवण्याची पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, यात्रेदरम्यान तत्काळ सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध ठेवून वैद्यकीय पथक सज्ज ठेवावे. महवितरणचे पथक स्वतंत्र कार्यान्वित असावे, जि.प.च्या वतीने अग्निशामक व्यवस्था करावी. पाणीपुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही, यासाठी स्वतंत्र पाणीव्यवस्थेसाठी यंत्रणा ठेवून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा तसेच वाहनासाठी स्वतंत्र पार्कीगंची व्यवस्था करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिल्या. (प्रतिनिधी)४
अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यानी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केली असून यासाठी ६ पोलिस निरिक्षक, ४० पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी असे एकूण ८०० मनुष्यबळ सज्ज असल्याचे सांगितले. माळेगाव यात्रेसाठी नियोजित निधीपेक्षा १० लाख रुपयांचा जादा निधी द्यावा, अशी मागणी यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी केली.