नळणीत बहरली डाळिंबाची शेती

By Admin | Updated: August 13, 2014 00:50 IST2014-08-13T00:13:12+5:302014-08-13T00:50:49+5:30

फकिरा देशमुख , भोकरदन तालुक्यातील नळणी समर्थनगर या गावात गेल्या चार पाच वर्षांपासून शेतकऱ्यांनी डाळींबाची शेती करण्याकडे लक्ष दिल्यामुळे येथील प्रगतीशील शेतकरी भीकनराव भिमराव वराडे

Pigeon-farm cultivation in tulle | नळणीत बहरली डाळिंबाची शेती

नळणीत बहरली डाळिंबाची शेती




फकिरा देशमुख , भोकरदन
तालुक्यातील नळणी समर्थनगर या गावात गेल्या चार पाच वर्षांपासून शेतकऱ्यांनी डाळींबाची शेती करण्याकडे लक्ष दिल्यामुळे येथील प्रगतीशील शेतकरी भीकनराव भिमराव वराडे यांना महाराष्ट्र शासणाच्या वतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे़
नळणी समर्थनगर येथील प्रगतीशील शेतकरी भिकनराव वराडे यांच्या पुढाकाराने सन २००८ मध्ये सय्यद जावेद या शेतकऱ्यासह नऊ शेतकऱ्यांनी गट स्थापन करून गटशेतीच्या माध्यमातून ११ हेक्टर क्षेत्रामध्ये भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली होती.
या शेतकऱ्यांनी गेल्या तीन ते चार वर्र्षांपासून डाळिंबाचे चांगले उत्पादन घेतले आहे. त्यामुळे या भागात डाळिंबाच्या बागा चांगल्याच बहरलेल्या दिसत आहेत .
भिकनराव वराडे यांच्याकडे २७ एकर खडकाळ माळराणाची शेती आहे. त्या पैकी ७ एकर क्षेत्रांमध्ये वराडे यांनी भगवा डाळिंबाची लागवड केलेली आहे. त्यांच्याकडे हंगामी पाणी असल्याने उन्हाळ्यामध्ये बाग कशी वाचवावीख ही परिस्थिती वराडे यांच्या समोर उभी असताना कृषी विभागा मार्फत त्यांनी १ कोटी ५० लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे घेतले व त्या शेततळ्याच्या माध्यमातून त्यानी डांळीबाची शेती फुलवली आहे़ ही शेती पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत.

Web Title: Pigeon-farm cultivation in tulle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.