सामाजिक संदेशाच्या चित्रांतून शहर बोलके होणार

By Admin | Updated: July 6, 2016 23:52 IST2016-07-06T23:38:22+5:302016-07-06T23:52:25+5:30

लातूर : ‘माझं लातूर, सुंदर लातूर’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता, जलपुनर्भरण आणि वृक्षारोपणाचा संदेश देणारे चित्र सार्वजनिक भिंतींवर रंगविले जाणार आहेत.

The pictures of social message will speak the city | सामाजिक संदेशाच्या चित्रांतून शहर बोलके होणार

सामाजिक संदेशाच्या चित्रांतून शहर बोलके होणार


लातूर : ‘माझं लातूर, सुंदर लातूर’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता, जलपुनर्भरण आणि वृक्षारोपणाचा संदेश देणारे चित्र सार्वजनिक भिंतींवर रंगविले जाणार आहेत. शहरातील चित्रकार व चित्रकलेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
लातूर शहर व परिसरातील सर्वच शासकीय कार्यालयांच्या भिंती, रस्ता, दुभाजके, उड्डाणपूल, मनपा संकुल, तहसील कार्यालय, आयटीआय या सारख्या प्रमुख शासकीय कार्यालयांच्या भिंती रंगवून त्यावर जलपुनर्भरण, वृक्षारोपण, स्वच्छता या संकल्पनेवर आधारित चित्र व म्हणी रेखाटण्यात येणार आहेत. शहरातील चित्रकार, चित्रकलेचे शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांचा यात सहभाग वाढवून हा उपक्रम यशस्वी केला जाणार आहे. मनपाच्या वतीने कलर व त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. याच्या पूर्व तयारीसाठी स्थायी सभापतींच्या दालनात बुधवारी बैठक झाली. या बैठकीला विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह रविशंकर जाधव, सहाय्यक आयुक्त वसुधा फड, नगर अभियंता नवनाथ केंद्रे, सतीश नरहरे, संजय अयाचित, शिवाजी हांडे, अशोक तोगरे, प्राचार्य पटवारी, निलेश मोरे, दिनेश लोखंडे, दिलीप लाड, राजेश खटके आदींची उपस्थिती होती.

Web Title: The pictures of social message will speak the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.