शासकीय कार्यालयांत शुकशुकाटाचे चित्र
By Admin | Updated: July 7, 2016 23:31 IST2016-07-07T23:29:12+5:302016-07-07T23:31:29+5:30
हिंगोली : मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान ईदनिमित्त आज अनेकांनी नैमित्तिक सुटीची संधी हेरून कार्यालयाला दांडी मारणे पसंत केले.

शासकीय कार्यालयांत शुकशुकाटाचे चित्र
हिंगोली : मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान ईदनिमित्त आज अनेकांनी नैमित्तिक सुटीची संधी हेरून कार्यालयाला दांडी मारणे पसंत केले. तर काहींनी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर पळ काढला.
रमजान ईदनिमित्त शासनाने ६ जुलै रोजी शासकीय सुटी दिली होती. मात्र चंद्रदर्शन न झाल्याने रमजान ईद एक दिवस उशिराने साजरी झाली. त्यामुळे मुस्लिम बांधवांसाठी नैमेत्तिक सुटी अथवा रजा घेण्याचा पर्याय होता. परंतु त्याचा लाभ घेत इतर अनेकांनीही कार्यालयाला चक्क दांडीच मारल्याचे दिसून येत होते. विविध शासकीय कार्यालयांत हेच चित्र पहायला मिळाले. दुपारनंतर तर अनेक कार्यालये रिकामीच दिसत होती. जि. प. सारख्या ठिकाणी तेरा विभागांपैकी मोजक्याच ठिकाणी कर्मचारी दिसत होते. तर जिल्हा कचेरीतही दुपारनंतर अनेक विभागांत हेच चित्र होते. इतर अनेक कार्यालयांत एरवीच कुणी राहात नाही. आज तर त्यांना दुहेरी मेजवानी होती. आता उद्याही अनेकजण अशाच संधीचा लाभ उठवतील, असे दिसते. पुन्हा दुसरा शनिवार व रविवारची सुटी आहेच. काहींनी तर रजाच टाकून दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)