वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात एड्स सप्ताहानिमित्त चित्र प्रदर्शन
By | Updated: December 5, 2020 04:08 IST2020-12-05T04:08:12+5:302020-12-05T04:08:12+5:30
प्रेरणा सामाजिक संस्था, उपजिल्हा रुग्णालय व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात ...

वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात एड्स सप्ताहानिमित्त चित्र प्रदर्शन
प्रेरणा सामाजिक संस्था, उपजिल्हा रुग्णालय व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या
संयुक्त विद्यमाने शुक्रवारी हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य धोंडिरामसिंह राजपूत व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांच्याहस्ते फीत कापून झाले. या चित्र प्रदर्शनात एचआयव्हीबाबत जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राजपूत, डॉ. प्रियंका जाधव, पी. ओ. शरद शिंदे, विजय
पाटील, समुपदेशक पंकज कांबळे, रविकांत गडकरी, शशिकांत पाटील, रवि विणकरे, संजय शिराळे, प्रेरणा संस्थेचे साईनाथ बारगळ, बापूराव वाळके, मनीषा
जाधव, संजय हिंदोळे, मयूर ठोंबरे, सचिन शिंदे, राहुल गायके, नारायण वाळके आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करताना डॉ. गजानन टारपे, धोंडीरामसिंह राजपूत आदी.