पिकअप- कारच्या अपघातात ८ जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:08 IST2017-08-28T00:08:16+5:302017-08-28T00:08:16+5:30
तालुक्यातील पिंपळदरी फाट्यावर हिंगोली - औंढा राज्यरस्त्यावर समोरासमोर झालेल्या पिकअप - कारच्या अपघात ८ गंभीर झाल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडली.

पिकअप- कारच्या अपघातात ८ जण गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी फाट्यावर हिंगोली - औंढा राज्यरस्त्यावर समोरासमोर झालेल्या पिकअप - कारच्या अपघात ८ गंभीर झाल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडली.
जखमी मध्ये कर्नाटक येथील प्रवाशांचा समावेश आहे. ते हिंगोली येथून बीदरकडे के. ए. २५ पी. १४५६ या क्रमांकाच्या कारने जात होते. तर त्यांच्या गाडीला पिंपळदरी फाट्याजवळ हैदराबाद येथून बुलडाणा मार्गे जाणाºया एम. एच. २८ ए. बी. ४८०७ या क्रमांकाच्या पिकाची समोरा समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भयंकर होता की, कार पाच फूट फरपटत गेल्याने गाढ झोपेत असलेले प्रवासी अचानक गोंधळून जागे झाले. यामध्ये कार मधील अलीमोद्दीन शेख नईमोद्दीन (४०), भटुराज शंकर अप्पा बलीम (४७), मो. इरफान गुलाम महेमूद (३०), जिन्नत बेगम अलिमोद्दीन (३५), समीना बेगम मक्सुद अली (३२), सय्यद खालीद (३२), बिस्मीला शेख गफार (३६) हे प्रवासी गंभीर झाले आहेत. तर पिकअप मधील चालक कृष्णा गवारे रा. चिखली हा देखील गंभीर जखमी झाला आहे. जखमीना नागनाथ संस्थानच्या गाडीने पोनि डॉ. गणपत दराडे यांनी हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालयात उपचारासाठी पहाटे ३. ४५ वाजता दाखल केले. फौजदार साईनाथ तुम्मोड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पिकअप चालका विरुद्ध औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.