पीआय, पीएसआय स्वीकारतात लाच !
By Admin | Updated: May 31, 2014 00:56 IST2014-05-31T00:53:53+5:302014-05-31T00:56:53+5:30
लातूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धडाधड कारवाया होत असतानाही पोलिस प्रशासनातील लाचखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही़
पीआय, पीएसआय स्वीकारतात लाच !
लातूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धडाधड कारवाया होत असतानाही पोलिस प्रशासनातील लाचखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही़ गेल्या दीड-दोन वर्षात पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांसह जवळपास १४ पोलिस लाचप्रकरणात अडकले आहेत़ त्यांच्याकडून सव्वा लाखाच्या आसपास लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे़ ५४ सापळ्यांपैकी ११ सापळ्यांत १४ पोलिस कर्मचारी अडकले़ त्यात एका पोलिस निरीक्षकासह दोघा फौजदारांचा समावेश होता़ लाचखोरीत महसूल कर्मचार्यांचा बोलबाला असला तरी आता त्यांच्यापुढे पोलिस कर्मचारी गेले आहेत़ आरोपीला अटक करू नये म्हणून लाच स्वीकारणे, वॉरंट न देण्यासाठी तसेच चार्जशीट आरोपीच्या बाजूने करण्यासाठी, हातकड्या न घालण्यासाठी आणि पोलिस कस्टडीत चांगली वागणूक देण्यासाठी लाच मागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ गेल्या दीड वर्षात एका पोलिस निरिक्षकासह दोघा फौजदारांनी आणि ११ पोलिस कर्मचार्यांनी लाच मागितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केले आहे़ देवणी पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकास तसेच औराद आणि लातूर ग्रामीणच्या पीएसआयलाही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे़ ट्रॅप केलेल्या १४ पोलिस कर्मचार्यांकडून १ लाख २५ हजार रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एऩजी़ अंकुशकर यांनी दिली़ पीआयच्या ट्रॅपमध्ये २५ हजाराची रक्कम होती तर पीएसआयच्या ट्रॅपमध्ये प्रत्येकी १५ हजाराची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे़ २५, २०, १५ हजार रूपयांचा पोलिस अधिकार्यांचा भाव आहे तर पोलिस कर्मचारी ९, ५, २, १ हजार रूपयात तडजोड होवून ५०० रूपये लाच स्वीकारल्याच्याही घटना जिल्ह्यात घडल्या आहेत़ ५४ पैकी १४ कर्मचारी पोलिस दलातील आहे़ ५४ पैकी १४ पोलिस कर्मचारी ट्रॅपमध्ये सापडले़ एकूण सापळ्यापैकी पोलिस कर्मचार्यांचे ११ सापळे आहेत़ तर अन्य विभागातील सापळ्यांच्या तुलनेत या विभागाचे लाचेचे प्रमाण २० टक्क्यावर आले आहे़, असेही पोलिस उपाधीक्षक अंकुशकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)