छायाचित्रकार शकील खान यांना प्रथम पुरस्कार

By Admin | Updated: August 25, 2014 00:25 IST2014-08-25T00:03:00+5:302014-08-25T00:25:11+5:30

औरंगाबाद : छायाचित्रकारांसाठी प्रदर्शनात लोकमत समाचारचे छायाचित्रकार शकील खान यांच्या ‘आई भूक व पाऊस’ छायाचित्रास प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

Photographer Shakeel Khan received first prize | छायाचित्रकार शकील खान यांना प्रथम पुरस्कार

छायाचित्रकार शकील खान यांना प्रथम पुरस्कार

औरंगाबाद : एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयात वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या छायाचित्रकारांसाठी प्रदर्शनात लोकमत समाचारचे छायाचित्रकार शकील खान यांच्या ‘आई भूक व पाऊस’ छायाचित्रास प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
द्वितीय पारितोषिक सचिन माने, तृतीय पारितोषिक मनोज पराती यांच्या छायाचित्रास मिळाले. पुरस्कार वितरण प्राचार्या डॉ. रेखा शेळके, प्रा. बी.के. परमार, प्रशांत दीक्षित यांच्या उपस्थितीत करण्यात आले. चांगले छायाचित्र टिपणे ही एक कला असून, ती जोपासताना अत्यंत चाणाक्षपणे हालचालींवर लक्ष ठेवावे लागते, विद्युत गतीपेक्षाही जास्त शार्पनेस तुम्ही ठेवला पाहिजे. एका क्लिकमधून टिपलेली छवी खूप काही सांगून जाते. विषयाला हात घालणारी छात्राचित्रे पुरस्कारास पात्र ठरतात. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, असा सल्ला मान्यवरांनी आपल्या भाषणात दिला.

Web Title: Photographer Shakeel Khan received first prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.