राजस्थानी संस्कृतीचे दर्शन
By Admin | Updated: September 26, 2016 00:38 IST2016-09-26T00:29:15+5:302016-09-26T00:38:40+5:30
‘अग्र महोत्सव २०१६’ अंतर्गत राजस्थानी नृत्य कलेचे विलोभनीय सादरीकरण करण्यात आले.

राजस्थानी संस्कृतीचे दर्शन
औरंगाबाद : अग्रसेन जयंती उत्सवानिमित्त अग्रवाल सभा, महिला समिती, युवा मंच, बहु बेटी मंडळ, भवन समिती, अग्रसेन शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अग्र महोत्सव २०१६’ अंतर्गत राजस्थानी नृत्य कलेचे विलोभनीय सादरीकरण करण्यात आले. महिलांची नृत्य स्पर्धा तसेच अंताक्षरी स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधले. युवकांची कबड्डी आणि शालेय विद्यार्थ्यांनी काढलेले वारली पेंटिंग हे दिवसाचे आकर्षण ठरले.
लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठीच विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे डॉ. सुशील भारूका, आनंद भारूका, विशाल लदनिया,जगदीश अग्रवाल, अशोक अग्रवाल, निर्मला अग्रवाल, जयश्री अग्रवाल, नवनीत भारतीय, अलकेश अग्रवाल, रजनी बगडिया, वंदना बगडिया, रतनलाल अग्रवाल, संदीप गोयल, सीताराम अग्रवाल, प्रफुल्लकुमार अग्रवाल, विजय गोयल, दिलीप अग्रवाल आदी प्रयत्न करत आहेत.
आवाहनास प्रतिसाद
दीप, मेणबत्या प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला ‘अग्रमहोत्सव- २०१६’ अंतर्गत पुरेपूर प्रतिसाद देण्यात आला. समस्त समाज बांधवांच्या उपस्थितीत मेणबत्ती पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून नंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.