माजलगावात अज्ञात इसमाचे सापडले प्रेत
By Admin | Updated: November 17, 2015 00:32 IST2015-11-16T23:45:17+5:302015-11-17T00:32:27+5:30
माजलगाव : शहरापासून जवळच असलेल्या घटाळवाडी शिवारात रविवारी रात्री उशिरा एका अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले. खून करून

माजलगावात अज्ञात इसमाचे सापडले प्रेत
माजलगाव : शहरापासून जवळच असलेल्या घटाळवाडी शिवारात रविवारी रात्री उशिरा एका अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले. खून करून त्या इसमाची ओळख मिटविण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.
माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या घटाळवाडी शिवारात कुलकर्णी यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात रविवारी रात्री एका व्यक्तीचे प्रेत आढळून आले. याची माहिती संबंधितांनी माजलगाव पोलिसांना दिली. पो. नि. चाटे यांनी रात्री घटनास्थळाला भेट दिली. त्या इसमास शेतामध्ये पुरण्याचा प्रयत्न झाला. तसेच त्याची ओळख मिटविण्यासाठी चेहऱ्यावर जखमा केल्या असल्याचे समोर आले.
भास्कर राजाभाऊ जाधव यांच्या खबरीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३०२, २०१ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो. नि. चाटे, कदम करीत आहेत. अद्याप मयताची ओळख पटलेली नाही. (वार्ताहर)