पेट्रोलपंपांवर ठणठणाट

By Admin | Updated: September 3, 2015 00:28 IST2015-09-02T22:40:30+5:302015-09-03T00:28:03+5:30

जालना : जालना शहरातील बहुतांश पेट्रोलपंप बुधवारी बंद होते. नो स्टॉक फलकांमुळे वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले. पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्याने पंप बंद ठेवण्यात आले

Petrol Pumps | पेट्रोलपंपांवर ठणठणाट

पेट्रोलपंपांवर ठणठणाट


जालना : जालना शहरातील बहुतांश पेट्रोलपंप बुधवारी बंद होते. नो स्टॉक फलकांमुळे वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले. पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्याने पंप बंद ठेवण्यात आले की काय अशी चर्चा वाहनचालकांत सुरु होती.
जालना शहरात शासकीय व खाजगी असे एकूण १८ पंप आहेत. यापैकी बहुतांश पंपांवर दुपारनंतर ठणठणाट होता. शहरातील विविध भागात पेट्रोल पंप आहेत. या ठिकाणी नियमित पेट्रोल मिळते. मात्र भाव कमी झाल्याने चालकांनी पंप बंद ठेवल्याच्या आफवेने वाहनचालकांची चांगलीच धावपळ झाली. काहींना दूरपर्यंत वाहन घेऊन चालावे लागले.
अर्ध्यापेक्षा अधिक पंप बंद असल्याचे अनेक वाहनचालकांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी पेट्रोलचे भाव दोन रुपयांनी तर डिझेल पन्नास पैशांनी कमी झाले. भाव कमी होताच अनेक वाहनचालकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पंप चालकांकडे जो जुना स्टॉक होता तो संपला. भाववाढीमुळे काही चालकांनी पेट्रोल व डिझेलची आॅर्डर दिली नव्हती. नवीन व जुन्या भावातील तफावतीमुळे नुकसान नको म्हणून अनेकांना विचारपूर्वक आॅर्डर दिल्याचे काही पंप चालकांनी सांगितले. असे असले तरी याचा फटका सर्वच वाहलनचालकांना सहन करावा लागला. बुधवारी मध्यरात्री अथवा गुरुवारी पहाटेपर्यंत सर्वच ठिकाणी पेट्रोल मिळेल असे पंप चालकांनी सांगितले. भारत, इंडेन, एचपीसीएल, हिंदुस्थान पेट्रोलियमचे काही पंप बंद तर काही सुरु होते. खाजगी पंप सुरु असल्याचे त्या पंपचालकांनी सांगितले. खाजगी पंपावर मुबलक पेट्रोल होते असा दावा केला. नवीन भावानुसारच पेट्रोलची विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. एकूणच भाव वाढीच्या घोळात अन काही पंप चालकांनी पंप बंद ठेवल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केली. भाव वाढ आणि पंप बंद याचा कोणताही संबंध नसल्याचे एका पंप चालकाने सांगितले. बुधवारी दुपारनंतर पंप बंदची चर्चा समजताच सर्वच पंपावर वाहनचालकांची मोठी गर्दी दिसून आली. या गर्दीमुळेही होते ते पेट्रोलही संपले. त्यामुळे पंप चालकांना नो स्टॉकचे फलक लावावे लागले. नागरिकांचे हाल पाहता पंप चालकांनी सूचना पत्रक काढावे, अशी मागणी काही वाहनचालकांनी केली. तर भाव कमी झाल्याचेमुळे पंप चालकांनी पंप बंद ठेवल्याचे काही वाहनचालकांनी ठासून सांगितले. एकूणच शहरात दुपारनंतर पेट्रोलच्या चर्चेला एकच उधाण आले होते. गुरुवारी पहाटे पेट्रोल सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी पेट्रोल ६७.३७ वरुन ६५.३८ रुपयांवर आले. म्हणजचे पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त झाले. डिझेलही ४९.७३ वरुन ४९.२१ रुपयांवर आले आहे. पेट्रोलचे दर कमी झाल्याने वाहनचालकांतून विशेषत: दुचाकी चालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

४जालना शहरात मनमाड, वाशी आदी ठिकाणाहून पेट्रोल येते. बुधवारी कामगारांच्या देशव्यापी संपामुळे पेट्रोल वाहतुकीवर परिणाम झाला. नांदगाव येथेही काही कामगार संघटनांनी टँकरसमोर धरणे धरल्याने टँकर वाहतुकीवर परिणाम झाल्याचे एका पंप चालकाने सांगितले.

Web Title: Petrol Pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.