शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा कांचनवाडी येथील पेट्रोल पंप तयार, फक्त एक परवानगी बाकी; लवकरच लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 20:05 IST

कांचनवाडी पेट्रोल पंप ऑगस्ट अखेर सुरू होणार अशी माहिती 

छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासनाने कांचनवाडी येथे दुसरा पेट्रोल पंप तयार केला. पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचा पुरवठाही करण्यात आला. पेट्रोल पंप चालविण्यासाठी दिव्यांग बांधवांची निवडही करण्यात आली. आता फक्त नॅशनल हायवेकडून अंतिम परवानगी मिळविण्याचे काम सुरू आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पेट्रोल पंप सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महापालिकेने सर्वप्रथम मध्यवर्ती जकात नाका येथे पहिला पेट्रोल पंप सुरू केला. या पंपाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पेट्रोल-डिझेलची विक्री मोठ्या प्रमाणात हाेत आहे. दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाला मिळत आहे. त्यामुळे शहरात आणखी चार ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. कांचनवाडी येथील मनपाच्या जागेवर दुसरा पंप सुरू करण्याचा निर्णय मागील वर्षी झाला. त्यासाठी पेट्रोलियम कंपनीला जागा उपलब्ध करून दिली. काही महिन्यात कंपनीने पंप उभा केला. तांत्रिक अडचणींमुळे सहा ते आठ महिन्यांपासून पेट्रोल पंप सुरू होण्यास विलंब होत आहे. विविध अडथळे दूर झाल्यानंतर लवकरच पंप सुरू करण्यात येणार आहे. नॅशनल हायवेकडून एक अंतिम एनओसी मिळणे बाकी आहे. ही एनओसी मिळाल्यावर लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.

दिव्यांग बांधवांची निवड पेट्रोल पंपावर कामासाठी दिव्यांग कर्मचारी ठेवण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. त्यानुसार मुलाखती घेऊन दहा जणांची निवड केली. या शिवाय काही सर्वसामान्य कर्मचारीही शिफ्टनुसार या ठिकाणी काम करतील. तिसरा पेट्रोल पंप शहानूरमियाँ दर्गा परिसरात सुरू केला जाणार आहे. त्यासाठी मालमत्ता विभागाकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.- अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPetrol Pumpपेट्रोल पंप