पेट्रोल ८०, तर डिझेल ६३ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:57 IST2017-09-12T00:57:32+5:302017-09-12T00:57:32+5:30

ट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्यास सुरुवात झाल्यानंतर इंधनाचे दर कमी होण्याऐवजी हळूहळू वाढतच आहेत.

Petrol is priced at Rs. 80, while diesel is Rs. 63 | पेट्रोल ८०, तर डिझेल ६३ रुपये

पेट्रोल ८०, तर डिझेल ६३ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्यास सुरुवात झाल्यानंतर इंधनाचे दर कमी होण्याऐवजी हळूहळू वाढतच आहेत. शहरात सोमवारी साध्या पेट्रोलचा दर ८०.३७, प्रीमिअम पेट्रोलचा दर ८३.३७, तर डिझेलचा दर ६३.२४ रुपयांवर पोहोचला आहे. दररोज दर बदलत असल्याने नागरिकांना ही दरवाढ असह्य होते आहे.
देशात १६ जूनपासून इंधनाचे दर दररोज बदलण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर उतरले तर आपल्याकडील इंधनाचे दरसुद्धा उतरतील असा सर्वांचा कयास होता. यानुसार सुरुवातीला ५० पैसे किंवा १ रुपयाने इंधनाचे दर कमीदेखील झाले; परंतु त्यानंतर इंधनाचे दर हळूहळू वाढतच आहेत. सुरुवातीच्या काळात ७६.७० रुपये प्रतिलिटर असणारे पेट्रोलचे दर आता चक्क ८० वर पोहोचले आहेत. गेल्या ३ महिन्यांत पेट्रोलचे दर ३ ते ४ रुपयांनी वाढले. हे दर हळूहळू वाढत गेल्याने ग्राहकांच्या एकदम लक्षात आले नाही. यामुळेच प्रारंभी इंधन दरवाढीवर वातावरण तापले नाही.

Web Title: Petrol is priced at Rs. 80, while diesel is Rs. 63

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.