मोटारसायकल ढकलून शहरात पेट्रोल,गॅस दरवाढीचा निषेध
By Admin | Updated: July 7, 2014 00:16 IST2014-07-06T23:37:58+5:302014-07-07T00:16:19+5:30
जालना : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ करून ‘बुरे दिन’ आणल्याचा आरोप करून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी शहरातून मोटारसायकल ढकलण्याचे आंदोलन करण्यात आले.

मोटारसायकल ढकलून शहरात पेट्रोल,गॅस दरवाढीचा निषेध
जालना : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ करून केंद्र सरकारने ‘अच्छे दिन’ नव्हे, तर ‘बुरे दिन’ आणल्याचा आरोप करून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी शहरातून मोटारसायकल ढकलण्याचे आंदोलन करण्यात आले.
सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मोटारसायकल हाती घेऊन पायी रॅली काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली निघालेल्या या रॅलीत आ. कैलास गोरंट्याल, महिला अध्यक्षा विमलताई आगलावे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बदर चाऊस, शहराध्यक्ष अब्दुल हाफिज, डॉ. सुभाष ढाकणे, सदाशिव गाढे, अंकुश राऊत, पं.स. उपसभापती सोपान तिरूखे, संजय जगदाळे, न.प. गटनेते राहुल हिवराळे, नगरसेवक महावीर ढक्का, अरूण मगरे, पार्वताबाई रत्नपारखे, मोहन इंगळे, संतोष माधवाले, वाजेदखान, महेंद्र अकोले, वसंत डोंगरे, शीतल तनपुरे, राम सावंत आदींचा यात प्रामुख्याने सहभाग होता.
जिल्हाध्यक्ष डोंगरे व आ. गोरंट्याल यांनी सर्वप्रथम मोटारसायकल ढकलून या आंदोलनाचा शुभारंभ केला. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत सरकारने केलेली पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमतीतील वाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही रॅली राम मंदिर, टांगा स्टँडमार्गे मामा चौक येथे पोहोचली.
यात दिगंबर पेरे, सय्यद मुसा, अरूण सरदार, मंजितराव टकले, सोनाबाई निकाळजे, गणेश गोरे, ज्ञानेश्वर डुकरे, मनोहर उघडे, रहिम तांबोळी, नीलेश खंडेलवाल, जफरखान, संजय खडके, विनोद यादव, इसाखान, पिंटू रत्नपारखे, कादर मोमीन, रमाकांत मद्दलवाल, मंगल खांडेभराड, सुमन निर्मळ, विनोद गड्डम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)