शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जेएमएफसी मुख्य परीक्षेबाबत याचिका; खंडपीठाची एमपीएससीला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:19 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी’ प्रथम वर्ग २०२२ व २०२३ साठी दोन्ही परीक्षा एकाच वर्षी घेतल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर : ‘दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी’ प्रथम वर्ग पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या मुख्य परीक्षेबाबत दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी एमपीएसीला नोटीस बजावण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी १८ सप्टेंबरला होईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी’ प्रथम वर्ग २०२२ व २०२३ साठी दोन्ही परीक्षा एकाच वर्षी घेतल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. २०२२ मध्ये पात्र ठरलेले ४८ विद्यार्थी पुन्हा २०२३ मध्येही पात्र ठरल्याने कट ऑफच्या जवळ पोहोचलेल्या अन्य विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

काय आहे याचिका ?महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग २०२२ व २०२३ साठीच्या दोन्ही परीक्षा एकाच वर्षी म्हणजे २०२३ मध्ये घेतल्या होत्या. सन २०२२ साठी घेतलेल्या परीक्षेत निवड झालेले राज्यातील जवळपास ४८ विद्यार्थी पुन्हा २०२३ साठीही पात्र ठरल्याने त्यांना पुन्हा एमपीएससीने मुलाखतीसाठी बोलावले. त्यामुळे अन्य कट ऑफच्या जवळपास गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संधी हिरावली जाण्याची शक्यता असल्याने आकाश माळी-पाटील, दीपाली शिंदे यांनी ॲड. गजानन एन. तीर्थकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. २०२२ च्या जाहिरातीमध्ये निवड झालेल्या ४८ विद्यार्थ्यांना पुन्हा २०२३ च्या मुलाखतीसाठी बोलाविण्यात आल्याने न्यायिक सेवानियमानुसार १:३ प्रमाण (रेशो) पूर्ण होत नसून, त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा युक्तिवाद तीर्थकर यांनी केला.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMPSC examएमपीएससी परीक्षा