अटकपूर्व जामीन रद्द केल्यासंदर्भात खंडपीठात याचिका

By | Updated: December 5, 2020 04:07 IST2020-12-05T04:07:39+5:302020-12-05T04:07:39+5:30

१९९४ ते ऑगस्ट २०१७ दरम्यान लैंगिक शोषण केल्याची तक्रार ६० वर्षाच्या वयोवृद्ध याचिकाकर्त्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात दाखल झाली ...

Petition to the bench regarding cancellation of pre-arrest bail | अटकपूर्व जामीन रद्द केल्यासंदर्भात खंडपीठात याचिका

अटकपूर्व जामीन रद्द केल्यासंदर्भात खंडपीठात याचिका

१९९४ ते ऑगस्ट २०१७ दरम्यान लैंगिक शोषण केल्याची तक्रार ६० वर्षाच्या वयोवृद्ध याचिकाकर्त्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या गुन्ह्यात मंजूर केलेला अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने रद्द केल्याविरुद्ध त्यांनी खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी तक्रारदार महिलेच्या पुरवणी जबाबावरून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल करून याचिकाकर्त्यांच्या डीएनए चाचणीसाठी परवानगी मागितली. न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला .याचिकाकर्त्याला हजर राहण्याबाबत समन्स काढले. मात्र याचिकाकर्ते आजारी असल्यामुळे गेले नाही. त्यांनी डीएनए चाचणीला मंजुरी देणाऱ्या आदेशाविरुद्ध सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने पुनर्विलोकन अर्ज खारीज केला . त्याविरुद्ध दाखल याचिका खंडपीठात प्रलंबित आहे. दरम्यान, हजर राहण्याच्या आदेशाचे पालन केले नाही. म्हणून अटकपूर्व जामीन रद्द करावा , यासाठी सरकारतर्फे दाखल अर्ज मंजूर करून सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द केला. त्या आदेशाविरुद्ध त्यांनी खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे . याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख काम पाहत आहेत त्यांना ॲड. देवांग देशमुख, गोविंद कुलकर्णी आणि विशाल चव्हाण सहकार्य करीत आहेत .

Web Title: Petition to the bench regarding cancellation of pre-arrest bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.