‘पैठणी’साठी पावणेदोन कोटींचे क्लस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:40 IST2017-08-08T00:40:52+5:302017-08-08T00:40:52+5:30

पैठणीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने १ कोटी ७५ लाख रूपयांच्या निधीचे पैठणी क्लस्टर मंजूर करण्यात आले असून या वर्षी २९ लाख रूपयांच्या निधीची तरतूद यासाठी करण्यात आली

Pethane crore cluster for 'Paithani' | ‘पैठणी’साठी पावणेदोन कोटींचे क्लस्टर

‘पैठणी’साठी पावणेदोन कोटींचे क्लस्टर

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठणीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने १ कोटी ७५ लाख रूपयांच्या निधीचे पैठणी क्लस्टर मंजूर करण्यात आले असून या वर्षी २९ लाख रूपयांच्या निधीची तरतूद यासाठी करण्यात आली असल्याची घोषणा वस्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी येथे केली. पैठणी साडी विणण्याची पारंपरिक कला जोपासणाºया पैठणी विणकरांना हक्काची घरे देण्यासाठी जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पैठण येथे राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या पैठण येथील मराठी पैठणी सेंटर येथे वस्त्र मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने राष्ट्रीय हातमाग दिवस विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार संदीपान भुमरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, नगरसेवक तुषार पाटील, सतीश पल्लोड, अलका मांजरेकर, नीना बनसोड, डी. ए. कुलकर्णी, एस. एम. स्वामी, आर. एम. परमार, शिवा पारिख, भूषण कावसानकर, ईश्वर दगडे, नाथ पोरवाल, विशाल पोहेकर, राणा मापारी, कृष्णा मापारी आदी मान्यवर उपस्थित होते.
वस्त्र मंत्रालयाचे उपसचिव आर. एम. परमार यांनी प्रास्ताविक करून राष्ट्रीय हातमाग दिनाबाबत माहिती देऊन हा दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी पैठणच्या विणकरांना राजाश्रय मिळाला पाहिजे, त्यांना घर उपलब्ध करून द्यावे
अशी मागणी केली. भुमरे यांनी यावेळी विणकरांच्या समस्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या.
राज्यातील पहिली रेशीम
बाजारपेठ जालन्यात
राज्यातील पैठणी विणकरांना रेशीम खरेदी करण्यासाठी व शेतकºयांना विकण्यासाठी बेंगळुरू येथे जावे लागते. राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे कृषीबरोबरच राज्यात रेशीम निर्मितीसाठी तुती लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
यामुळे रेशीमची राज्यातील पहिली बाजारपेठ जालना येथे उभारण्यात येत असल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली. या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी शेतकºयांनी तुतीची लागवड वाढवावी, असे आवाहन खोतकर यांनी केले.
पैठण तालुक्यात रेशीम कारखाना उभारण्यासाठी आमदार संदीपान भुमरे यांनी प्रस्ताव द्यावा, तो प्रस्ताव दोन मिनिटात मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा खोतकर यांनी यावेळी केली.
खोतकर पैठणचे जावई
खोतकर हे पैठणचे जावई व नगरसेवक तुषार पाटील यांचे मेव्हणे आहेत. पैठण येथे सोमवारी शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर खोतकर हे पैठण शहरात पाहुणे म्हणूनच वागले. कार्यकर्ते, पत्रकार, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याशी मनमोकळी चर्चा केली.
जाता जाता परत विणकरांच्या घराच्या प्रस्तावाबाबत नगरसेवक तुषार पाटील यांना पाठपुरावा करा असा सल्ला दिला. पैठण शहरातील नागरिकांशी खोतकर यांनी आपुलकीने संवाद साधत पैठणकरांचे मन जिंकून घेतले.

Web Title: Pethane crore cluster for 'Paithani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.