निराशावादी लोकांना पे्ररणादायी आत्मकथन
By Admin | Updated: July 18, 2016 01:07 IST2016-07-18T00:52:18+5:302016-07-18T01:07:01+5:30
लातूर : प्रकाश पेरताना हे आत्मकथन निराशावादी लोकांना पे्ररणादायी, असे आहे़ लेखक कामगार उपायुक्त नारायण ईटकरी यांनी आपल्या प्रवासाची संपूर्ण वाटचाल या आत्मकथनात उलगडली आहे,

निराशावादी लोकांना पे्ररणादायी आत्मकथन
लातूर : प्रकाश पेरताना हे आत्मकथन निराशावादी लोकांना पे्ररणादायी, असे आहे़ लेखक कामगार उपायुक्त नारायण ईटकरी यांनी आपल्या प्रवासाची संपूर्ण वाटचाल या आत्मकथनात उलगडली आहे, असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक रा़ऱ बोराडे यांनी येथे केले़
कामगार उपायुक्त नारायण ईटकरी लिखित आत्मकथनाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी डॉ़ सूर्यनारायण रणसुभे होते़ मंचावर डॉ़ शेषेराव मोहिते, प्रा़ डॉ़ भास्कर बडे, प्रा़ राजा होळकुंदे, चैतन्य ईटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी बोराडे म्हणाले, आपण जे भोगले त्याचे यथार्थ चित्रण यामध्ये करण्यात आले आहे़ शिक्षणाच्या माध्यमातून मिळालेला प्रकाश इतरांच्या आयुष्यात पेरण्याचा प्रयत्न ईटकरी यांनी केला आहे़ या आत्मकथनात माणुसकीची भाषा, जीवनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टीकोण मांडण्यात आला आहे़ जातीच्या भिंतींना यातून छेद देण्यात आला असल्याचेही बोराडे म्हणाले़
डॉ़ रणसुभे म्हणाले, या आत्मकथनातून निश्चितपणे लोकांना पे्ररणा मिळेल़ प्रा़ मोहिते म्हणाले, माणुसकीचे दर्शन घडविणारे हे आत्मकथन आहे़ सूत्रसंचलन प्रा़ राजा होळकुंदे यांनी केले़ आभार बडे यांनी मानले़ प्रारंभी लेखक नारायण ईटकरी यांनी ग्रंथाची भूमीका विशद केली़