शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

एकट्या मुलीला पाहून विकृत कारचालकाचे अश्लील इशारे; संतप्त युवतीने पोलिसांसमोरच बदडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:39 IST

नोटा दाखवून अश्लील इशारे करणे पडले महागात; अल्पवयीन तरुणीने विकृताचा माज उतरवला

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी क्रांती चौकात मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या १७ वर्षीय मुलीला पाहून एका विकृत कार चालकाने अश्लील इशारे केले. मुलीने त्याकडे दुर्लक्ष करत तेथून काढता पाय घेतला. मात्र, त्यानंतरही त्याने तिचा पाठलाग सुरू केला. मुलीने जवळच उभ्या वाहतूक पोलिसांना सांगितल्यावर दामिनी पथकही आले. मग त्यांच्यासमोर विकृत गयावया करायला लागला. संतप्त तरुणीने मात्र तेथेच त्याची धुलाई करत माज उतरवला. याप्रकरणी खिवाराम कानाराम देवासी (४८, रा. हुबळी, कर्नाटक) याच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलगी शेतकरी कुटुंबातील आहे. ती शिक्षणासाठी शहरात असते. ती दुपारी ३ वाजता क्रांती चौकात मैत्रिणीची वाट पाहत होती. यावेळी खिवाराम तेथेच होता. तरुणीला पाहून त्याने अश्लील चाळे सुरू केले. सुरुवातीला युवतीने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, खिवारामने चाळे सुरूच ठेवले. नोटा दाखवून इशारे केले. त्यामुळे तरुणीने जवळच उभ्या वाहतूक पोलिसांकडे धाव घेतली. तर त्याने तिचा पाठलाग सुरू केला. वाहतूक पोलिसांकडून ही बाब कळताच पोलिस निरीक्षक सुनील माने, दामिनी पथकाच्या अंमलदार निर्मला निंभोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, दामिनी पथकप्रमुख कांचन मिरधे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली.

मुलीने धुतले, मग पाया पडून गयावयापोलिसांनी त्याला विचारणा करताच खिवारामची बोबडी वळली. संतप्त युवतीने त्याची पोलिसांसमक्ष यथेच्छ धुलाई केली. यावेळी बघ्यांची गर्दी जमा झाली. आपण पुरते अडकलो गेल्याचे कळाल्यानंतर खिवाराम तरुणीच्या पाया पकडून माफी मागत गयावया करू लागला. त्यानंतर त्याला क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तरुणीचे कुटुंब सोबत नसल्याने तरुणीने तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर निरीक्षक सुनील माने यांनी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली.

चालक, प्रवासी सोडण्यासाठी शहरातघटनेवेळी क्रांती चौकात बघ्यांची गर्दी जमली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. विवाहित असलेला खयाराम मूळ कर्नाटक राज्यातील असून, सध्या कामानिमित्त पुण्यात स्थायिक आहे. सोमवारी तो प्रवासी सोडण्यासाठी शहरात आला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Pervert Harasses Girl, Gets Beaten; Arrested in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : A 17-year-old girl was harassed by a car driver in Chhatrapati Sambhajinagar. He made obscene gestures, leading to a confrontation. The girl beat him in front of police. The accused, Khivaram Dewasi, was arrested.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsexual harassmentलैंगिक छळ