इच्छामरणाची मागितली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:28 IST2017-11-17T23:28:29+5:302017-11-17T23:28:34+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील कृषी पंपासाठी आडविलेले रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे सध्या रब्बी हंगामातील पिकांना तसेच जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यातुनच पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने होणारे नुकसान यामुळे आमच्या कुटूंबासह आत्महत्या करण्याची वेळ आल्याने या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे ईच्छमरणाची परवानगी मागितली आहे.

इच्छामरणाची मागितली परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळाबाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील कृषी पंपासाठी आडविलेले रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे सध्या रब्बी हंगामातील पिकांना तसेच जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यातुनच पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने होणारे नुकसान यामुळे आमच्या कुटूंबासह आत्महत्या करण्याची वेळ आल्याने या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे ईच्छमरणाची परवानगी मागितली आहे.
नालेगाव येथील कृषीपंपासाठी अनेक रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. रोहित्र मिळावे, यासाठी ३ नोव्हेंबर २०१७ पासून कार्यकारी अभियंता हिंगोली यांच्याकडे पाठपुरवा करूनही रोहित्र मिळालेले नाही. विशेष म्हणजे सध्या शेतकºयांकडे पैसा उपलब्ध नसतानाही शेतकºयांना वीज वितरण कंपनीकडून देयक वसुलीसाठी आडवणूक होत असून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही शेतकºयांनी बाजारामध्ये शेतीमालाचे भाव पडले असूनही कमी भावात माल विकून या रोहित्रावरील शेतकºयांनी तीस हजार रुपये देयके भरणा केलेला आहे. असे असूनही वीज कंपनीकडून अद्यापही रोहित्र न मिळाल्यास आमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने आम्हाला कुटूंबासह आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. नसता शेतकºयांच्या आत्महत्येस वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांना जबाबदार धरण्यात यावे, हे अशक्य असेल तर आम्हाला इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, असे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले आहे. यामध्ये किसन राखोंडे, शिवाजी राखोंडे, सुदाम राखोंडे, सज्जन राखोंडे, केशव राखोंडे, ज्ञानेश्वर राखोंडे, माणिक राखोंडे, प्रकाश कदम, बापुराव राखोंडे, पांडुरंग राखोंडे, देविदास राखोंडे आदी शेतकºयांनी दिले आहे.