शेतकºयांना शाश्वत वीज देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:12 IST2017-08-13T00:12:55+5:302017-08-13T00:12:55+5:30
सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यातील चाळीस लाख शेतकºयांना २०१९ पर्यंत शाश्वत वीज जोडणी देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

शेतकºयांना शाश्वत वीज देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यातील चाळीस लाख शेतकºयांना २०१९ पर्यंत शाश्वत वीज जोडणी देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महावितरणच्या दीनदयाल उपाध्यय ग्रामज्योती व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत ३३ केव्ही उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी येथील मातोश्री लॉन्समध्ये ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, नारायण कुचे, संतोष दानवे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, माजी. आ. विलास खरात, अरविंद चव्हाण, कैलास गोरंट्याल, रामेश्वर भांदरगे, भास्कर दानवे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता कैलास हुमणे उपस्थित होते.
ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, मागील काळात मराठवाडा व विदर्भावर वीजपुरवठ्याबाबत अन्याय झाला. युती सरकारने तीन वर्षात तीन लाख प्रलंबित जोडण्यांचे काम पूर्ण केले. जालना जिल्ह्यात १४ हजार शेतकºयांना जोडण्या दिल्या. विजेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी दोन वर्षात महावितरण व महापारेषणच्या माध्यमातून जिल्ह्यात दोनशे कोटींची कामे होणार आहेत. जालना व परभणी जिल्ह्यात काम करताना गुत्तेदार तक्रारी करतात. त्यामुळे मंजूर कामे कशी पूर्ण होतील यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात शहरी भागासाठी ३३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. भोकरदन शहरासाठी ४ कोटी, परतूरसाठी ६ कोटी, अंबडसाठी ६ कोटी तर जालना शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. संपूर्ण शाळांवर सोलार सिस्टीम बसवा. त्यासाठी ५० टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यातून द्यावा, उर्वरित निधी राज्य शासन देईल. तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असणाºया ग्रामपंचायतींना गावातील इलेक्ट्रिक ट्रेड उत्तीर्ण तरुणांना लाइनमन म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले. खा. दानवे म्हणाले, विजेचा पुरेपूर वापर करण्यासाठी राज्यात पायाभूत सुविधा निर्मितीचे काम वेगात सुरू आहे. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यातील विकासकामांसाठी १८५ कोटी निधी मंजुर केले आहेत. जिल्ह्याचा विजेचा बॅकलॉग तातडीने भरून काढावा, अशी अपेक्षा राज्यमंत्री खोतकर यांनी व्यक्त केली. आ.टोपे यांनी जिल्ह्यातील वीजपुरवठ्याच्या अडचणी सोडविण्याची मागणी केली.