कळंबला मिळणार कायमस्वरुपी ‘बीडीओ’
By Admin | Updated: August 22, 2016 01:15 IST2016-08-22T00:58:55+5:302016-08-22T01:15:11+5:30
कळंब : येथील पंचायत समितीवर मागील चार वर्षापासून सुरू असलेले प्रभारीराज संपण्याच्या मार्गावर आहे़ शासनाने परिपत्रक निर्गमित करून

कळंबला मिळणार कायमस्वरुपी ‘बीडीओ’
कळंब : येथील पंचायत समितीवर मागील चार वर्षापासून सुरू असलेले प्रभारीराज संपण्याच्या मार्गावर आहे़ शासनाने परिपत्रक निर्गमित करून परिविक्षाधीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल सुभाष गायकवाड यांच्याकडे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा स्वतंत्र कार्यभार दिला आहे़ गायकवाड हे आॅगस्ट अखेर अखेरीस गटविकास अधिकारीपदाचा पदभार हाती घेणार आहेत़
तत्कालीन गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांची बदली झाल्यानंतर तब्बल पाच अधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून कारभार हाकावा लागला़ त्यानंतर शांता सुरेवाड या नियमीत अधिकारी आल्या़ परंतु त्यांची कारकिर्दही वादग्रस्त ठरली. पदाधिकारी व सुरेवाड यांच्यातील संघषार्नंतर त्यांनी वैद्यकीय रजेवर जाऊन कळंबला रामराम ठोकला. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत तर सध्या महाग्रारोहयोचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी रावसाहेब चव्हाण हे पं.स.ा कारभार हाकत आहेत़ आता शासनाने शनिवारी २०१४ च्या बॅचमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांचा ६६ आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम निश्चीत केला आहे. यानुसार येथील गटविकास अधिकारी पदाचा स्वतंत्र कार्यभार राहूल सूभाष गायकवाड यांच्यावर सोपवला आहे.
सुभाष गायकवाड हे २९ आॅगस्ट ते २१ जानेवारी २०१७ या कालावधीत कळंब येथे आपला परिवीक्षाधीन कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. त्यामुळे आगामी सहा महिन्याच्या कालावधीसाठी तरी कळंब पंचायत समितीला पूर्णवेळ व नियमित अधिकारी लाभणार आहे.