विधानसभेत महिला मतदारांचा टक्का वाढला
By Admin | Updated: October 17, 2014 00:26 IST2014-10-17T00:15:23+5:302014-10-17T00:26:49+5:30
जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. सरासरी ४२.३० महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

विधानसभेत महिला मतदारांचा टक्का वाढला
जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. सरासरी ४२.३० महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पाच महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील महिलांचे मतदान बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सरासरी १० टक्क्यांनी वाढले आहे. नवमतदारांमध्ये युवतींचाही उत्स्फुर्त सहभाग दिसून आला.
जिल्ह्यात पाचही मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी २५ हजार ३७० नवीन मतदारांची संख्या वाढली आहे. यामध्ये सरासरी १२ टक्के महिला मतदारांची वाढीव संख्या सरासरी १२ टक्के होेती.
जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा लोकसभा मतदारसंघात समावेश आहे.
लोकसभेकरीता जालना मतदारसंघातून ६७ हजार ६९, बदनापूरमधून ७९ हजार ५३५ तर भोकरदनमधून ८३ हजार १०१ महिला मतदारांनी मतदान केले होते. याच तिन्ही मतदारसंघातून विधानसभेकरीता अनुक्रमे जालना ७९ हजार ४३८, बदनापूर ८४ हजार ३३ व भोकरदन ९० हजार ६६४ एवढ्या महिला मतदारांनी मतदान केले. परतूर व घनसावंगी मतदारसंघ लोकसभेकरीता परभणी मतदारसंघात होते. मात्र या दोन्ही मतदारसंघातही या निवडणुकीत महिलांच्या मतदानाचे प्रमाण वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. परतूरमधून ८५ हजार ८६५ तर घनसावंगीतून ९९३७२ महिलांनी मतदान केले. (प्रतिनिधी)