लिंबाच्या झाडात फांदीच्या रुपाने नाग अवतरल्याची लोकांची भावना
By Admin | Updated: June 29, 2014 00:24 IST2014-06-29T00:09:16+5:302014-06-29T00:24:48+5:30
लक्ष्मण तुरेराव, धर्माबाद रावधानोरा बु. ता. उमरी शिवारातील शेतातील लिंबाच्या झाडात नागफडा काढल्यासारखे पाच फडे निर्माण झाले. एकप्रकारे फांदीच्या रुपात नाग अवतरल्याची भावना नागरिकांत व्यक्त
लिंबाच्या झाडात फांदीच्या रुपाने नाग अवतरल्याची लोकांची भावना
लक्ष्मण तुरेराव, धर्माबाद
रावधानोरा बु. ता. उमरी शिवारातील शेतातील लिंबाच्या झाडात नागफडा काढल्यासारखे पाच फडे निर्माण झाले. एकप्रकारे फांदीच्या रुपात नाग अवतरल्याची भावना नागरिकांत व्यक्त होऊन दर्शनासाठी मोठी गर्दी याठिकाणी होत आहे. या शेतात दर सोमवारी भोजनदानही केले जाते.
रावधानोरा येथील मारोती कोंडिबा सिद्धेवाड व चपंतराव गोविंदराव सर्जे यांचे शेत आहे. शेतातील धुऱ्यावर छोटेसे लिंबाचे झाड आहे. झाडातून निघालेल्या फांदीत उपरोक्तप्रमाणे प्रकार दिसून आला. मारोती सिद्धेवाड यांना फांदी नागाच्या फडासारखी दिसली. गावातही ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली. झाड पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. काहीजण भक्तिभावाने झाडाचे दर्शन घेवू लागले. दर सोमवारी भोजनदान करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. आठ महिन्यांपासून येथे भोजनदान केले जाते. सात ते आठ क्विंटल तांदळाचे अन्नदान केले जाते. झाडाच्या दर्शनाने इच्छा पूर्ण होते, अशी भावनाही पसरली आहे. (वार्ताहर)
लिंबाच्या झाडाखाली वारुळ असून परिसरात नागसाप फिरत असल्याचे सांगितले जाते. २६ जानेवारी २०१४ रोजी दिवसभर साप झाडावर होता, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. त्यामुळे ही जागा नागदेवताची आहे, अशी भावना पसरली. या स्थानाला आता ‘नागदेवता’ देवस्थान असे नाव देण्यात आले. मारोती सिद्धेवाड यांच्या शेतात नागदेवतेचे मंदिर बांधण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याच्या व्यवस्थेसाठी बोअरही घेण्यात आला.