शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
6
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
7
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
8
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
9
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
10
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
11
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
13
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
14
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
15
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
16
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
17
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
18
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
19
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
20
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला

औरंगाबादमध्ये राग व संतापाने एकवटली जनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:24 IST

संकेत कुलकर्णीच्या भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येने कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविल्या असतानाच नागरिकही हादरले होते. मनामध्ये दाटलेला राग व संताप नागरिकांनी रविवारी उत्स्फूर्त शोकसभा बोलावून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दाखवून दिला.

ठळक मुद्देसंकेत कुलकर्णी खून प्रकरण : उत्स्फूर्त संयोजनातून शोकसभा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : संकेत कुलकर्णीच्या भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येने कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविल्या असतानाच नागरिकही हादरले होते. मनामध्ये दाटलेला राग व संताप नागरिकांनी रविवारी उत्स्फूर्त शोकसभा बोलावून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दाखवून दिला. आरोपींना अटक न झाल्यास पुढील सोमवारी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा अल्टिमेटमही देण्यात आला. यावेळी संकेतचे वडील संजय कुलकर्णी यांच्यासह नातेवाईक व बाहेरगावांहून आप्तेष्ट आले होते.संकेतच्या फरार मारेकऱ्याला त्वरित अटक करा, त्यांच्यावर जलदगती कोर्र्टात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी एकमुखी मागणी यावेळी नागरिकांनी केली. या शोकसभेचे आयोजन कोणत्याही पक्ष, संघटनेच्या पाठिंब्याशिवाय सामान्य नागरिकांनीच केले होते. सामान्यांच्या हाकेला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने नागरिक या शोकसभेला हजर झाले. ज्याठिकाणी ही क्रूर हत्या झाली, त्याच सिडको एन-२, ठाकरेनगर चौकात रविवारी सायंकाळी ४ वाजता ही शोकसभा झाली. यावेळी विविध पक्ष, संघटना तसेच जाती-धर्मांचे नागरिक शोकसभेत सहभागी झाले होते. दोन मिनिटे शांत उभे राहून संकेतला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.आम्ही प्रयत्न केले; परंतु...घटनेच्या प्रत्यक्षदर्शी मीरा पाटील, जयश्री शिवपुरे यांनी यावेळी कथन केलेल्या बाबींनी अनेकांचे डोळे पाणावले होते. हा खून कसा झाला याचे वर्णन करताना त्यांनी घटनास्थळावरचे चित्रच उभे केले. त्या म्हणाल्या मारेकºयांना दगडाचा मारा करून अटकाव करण्याचाही प्रयत्न केला; परंतु बचाव करणारेदेखील जीवाच्या भीतीने सैरभैर पळत होते. मारेकरी अखेर त्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला होता. आम्ही हतबल होऊन संकेतला वाचविण्यात अपयशी ठरलो, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. रेणुका घुले म्हणाल्या की, माझा नातेवाईक मुलगाही या प्रकारात जखमी असून, तो अद्याप त्यातून सावरला नाही. अंगावर गाडी घालून ठार मारण्याची ही घटना अत्यंत निंदणीय आहे. आरोपीला फाशीच व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.अजूनही कुणाकडे पुरावे असतील, तर त्यांंनी पुढे यावेहा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. एक संकेत नव्हे, तर अनेक अनर्थकारक घटना होण्यापासून वाचविण्यासाठी पालक व प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना घटनेची माहिती, व्हिडिओ, फोटो द्यावेत, अशी भूमिका माजी महापौर भगवान घडामोडे, संजय जोशी, संजय केणेकर, सविता कुलकर्णी, मिलिंद दामोदरे, दामूअण्णा शिंदे, माधुरी अदवंत, रंजना कुलकर्णी, राजू वैद्य यांनी मनोगतातून मांडली.संकेत कुलकर्णी खुनातील फरार आरोपींवर खुनासह १२० ब प्रमाणे गुन्हा लावला आहे. ते फरार असल्याने त्यांच्या पालकांनाच मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एक-दोन दिवसांत फरार आरोपीदेखील ताब्यात येतील. पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसcidcoसिडको