शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

आजोबांच्या गावच्याच लोकांनी दीड कोटींच्या खंडणीसाठी रचला नातीच्या अपहरणाचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:51 IST

आजोबांच्या आलिशान गाड्या, प्रॉपर्टी पाहून गावच्या लोकांनी रचला डाव,

छत्रपती संभाजीनगर : खासगी शिकवणी संपवून निघालेल्या ११ वर्षीय मुलीचा चार आरोपींनी कारमधून अपहरणाचा प्रयत्न बुधवारी (दि. १५) केला हाेता. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मोठी दुर्घटना टळली. शहर पोलिसांच्या दहापेक्षा अधिक पथकांनी राताेरात आरोपींची ओळख पटवत दोघांना बेड्या ठाेकल्या. अपहरणकर्ते व मुलीचे आजोबा एकाच गावचे असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्या मुलीच्या आजोबाकडून दीड कोटी रुपये खंडणी उकळण्यासाठी हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समाेर आली.

अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप उर्फ पप्पू साहेबराव पवार (३२, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) आणि बाबासाहेब अशोक मोरे (४२, रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) यांचा समावेश आहे. या घटनेचा मास्टरमाइंड गणेश ज्ञानेश्वर मोरे आणि बळीराम उर्फ भय्या मोहन महाजन (दोघेही रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) हे फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार घटना घडल्यानंतर आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखा, सायबर, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासह झोन-२मधील डीबी पथकांना कामाला लावले होते.

घटनास्थळी सोडलेली गाडी, गाडीतील नंबर प्लेट, सीसीटीव्ही फुटेजसह मुलगी, चालकाच्या वर्णनावरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानुसार आरोपीच्या गावी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांचे पथक पाठविले. पथक गावात पोहचल्यानंतर गुन्ह्यातील दोन आरोपी अंबड - पाचोड रस्त्यावरील पिंपरखेड येथील हॉटेल लोकसेवा येथे जेवण करीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने हॉटेलमधून दोन आरोपींना ताब्यात घेतले. शहरात आणल्यानंतर चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, कृष्णा शिंदे, शिवचरण पांढरे, सहायक निरीक्षक विनायक शेळके, रविकांत गच्चे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, नवनाथ पाटवदकर, विशाल बोडके, प्रवीण वाघ यांच्या पथकांनी केली.

कुटुंबाला दिले संरक्षणअपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलीच्या कुटुंबाला शहर पोलिसांनी संरक्षण दिले आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या प्रकरणाशी साधर्म्यबांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चैतन्य तुपे याच्या अपहरणानंतर आरोपींनी फोन करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या घटनेतील आरोपी आलना जिल्ह्यातीलच होते. त्यांनी बाहेरून येऊन अपहरण केले होते. बुधवारी घडलेल्या घटनेतही आरोपी जालना जिल्ह्यातीलच असून, त्यांनीही दीड कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा कट होता. तसेच यात मुलीचे आजोबा हे जमीन व्यावसायिक आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर