शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजार वारसदार मुलांना मिळत आहे निवृत्तीवेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 16:45 IST

पेन्शनर्सच्या पश्चात पत्नी व दोन मुलांना पेन्शन मिळते.

ठळक मुद्देमराठवाड्यात ६३ हजारपेक्षा अधिक पेन्शनधारक वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेले सुपर अनिवेशन पेन्शनर्स २३ हजार २९० आहेत.

औरंगाबाद : सेवानिवृत्त वडील व आईच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात १८ वर्षांच्या आतील मुलांना (वारसांना) आई-वडिलांचे निवृत्तीवेतन मिळते. विभागात अशा ५ हजार ६५६ वारसदारांना सध्या पेन्शन मिळत आहे.  

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे क्षेत्रीय आयुक्त एम.एच. वारसी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले की, आजघडीला विभागात ६३ हजारांपेक्षा अधिकांना निवृत्तीवेतन मिळत आहे. त्यात वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेले सुपर अनिवेशन पेन्शनर्स २३ हजार २९० आहेत. अर्ली पेन्शनधारक १८ हजार ४८५ आहेत. पेन्शनर्सचे निधन झाल्यास त्यांच्या पश्चात पत्नीला पेन्शन मिळते, अशांची संख्या १३ हजार ६०३ आहे, तसेच पेन्शनर्सच्या पश्चात पत्नी व दोन मुलांना पेन्शन मिळते. एकूण पेन्शनच्या ७५ टक्के रक्कम पत्नीला व उर्वरित रकमेतील निम्मी-निम्मी रक्कम त्या १८ वर्षांखालील दोन मुलांना मिळते. अशा ५ हजार ६५६ वारसदार मुलांना पेन्शनची रक्कम मिळत आहे. सेवानिवृत्त वडील व आईच्या पश्चात पेन्शनचा लाभ १२१ मुलांना मिळतो आहे. नॉमिनी पेन्शनधारकांची संख्या ७४ आहे. मागील ३ वर्षांदरम्यान ८ हजार सेवानिवृत्तांनी हयात प्रमाणपत्र दाखल केले नाही. त्यांचे निवृत्तीवेतन रोखले आहे. यातील अनेकांना त्यांच्या सेवाकाळातील पत्त्यावर पत्र पाठविले आहे. त्यातील १,४०० जणांनी नंतर हयात प्रमाणपत्र दाखल केले व त्यांची पेन्शन सुरू झाली. 

विद्यापीठातील कंत्राटी कामगारांची चौकशीडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात खाजगी कंत्राटी कामगार काम करीत आहेत. मात्र, त्यांचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करण्यात येत नसल्याचे उजेडात आले आहे. यासंदर्भात याआधी विद्यापीठ प्रशासनाला नोटीस पाठविण्यात आली. पीएफ कार्यालयाने चौकशी सुरू केली आहे. नवे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आज पदभार स्वीकारला आहे. त्यांना याविषयी माहिती देऊन पुढील चौकशी सुरू राहणार आहे. 

टॅग्स :fundsनिधीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा