पेन्शनधारकांची निदर्शने
By Admin | Updated: September 12, 2014 00:06 IST2014-09-11T23:50:45+5:302014-09-12T00:06:50+5:30
नांदेड : निवृत्त कामागारांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करावी या मागणीसाठी ई़पी़एस़९५ पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली़

पेन्शनधारकांची निदर्शने
नांदेड : निवृत्त कामागारांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करावी या मागणीसाठी ई़पी़एस़९५ पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली़
आजच्या महागाईच्या काळात निवृत्त कामगारांना किमान ७४ ते २५०० रूपये इतके कमी पेन्शन दिले जात असून याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघर्ष समितीने केला़ या पेन्शनमध्ये वाढ करून ६ हजार ६०० रूपये पेन्शन व महागाई भत्ता द्यावा, या योजनेतील बंद केलेले सर्व लाभ सुरू करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली़ यापूर्वी भाजपा नेत्यांनी सरकार आले तर ९० दिवसांत पेन्शनमध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले होते याची आठवणही करून देण्यात आली़ आंदोलनात एम़ आऱ जाधव, आऱ एम़ सूर्यवंशी, स़ना़ अंबेकर, डी़ एम़ गंगातीरे, एस़ एस़ तारू, आऱ एच़ गवळी, पी़ डी़ नाईक, व्यंकटेश बुलबुले, के़आऱ हाटकर, श्रीधर हाटक, गंगाधर येवले, एम़ टी़ लुंगारे, के़ टी़ मगरे, डी़ आऱ इनामदार, एस़ के़ सोनकांबळे, एम़ आऱ गवळी, राज महमद, सय्यद नबी पटेल आदींनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)