पावणेपाच हजार जणांवर रेल्वेची दंडात्मक कारवाई
By Admin | Updated: August 8, 2014 00:33 IST2014-08-08T00:28:14+5:302014-08-08T00:33:56+5:30
नांदेड: प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देत रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल पावणेपाच हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़

पावणेपाच हजार जणांवर रेल्वेची दंडात्मक कारवाई
नांदेड: प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देत रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल पावणेपाच हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़
दक्षिण मध्य रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वेस्थानकावर एकाच दिवशी व्यापक मोहिम राबविण्यात आली़ यात ४ हजार ८५८ जण नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले़ दंडापोटी तब्बल ९ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ बुधवारी सकाळी पाच ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत रेल्वे विभागातील वाणिज्य विभाग, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला़ विनातिकीट प्रवास करणे, विनापरवानगी सामानाची वाहतूक, धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडने, खाद्यवस्तूंची अवैधरित्या विक्री करणे, महिला प्रवाशांच्या डब्यातून प्रवास करणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली़ रेल्वे स्थानक परिसरात धुम्रपान करुन घाण पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे विशेष निर्देश देण्यात आले होते़ अशा प्रवाशांकडून ५०० रुपये दंड आकारण्यात आला़ (प्रतिनिधी)